शनिवार, २ जुलै, २०२२

🟢 कार्यकारिणी सभा : शनिवार दि. 2 जुलै 22

🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा अपडेट

🟢 कार्यकारिणी सभा : शनिवार दि. 2 जुलै 22

🔵 कणकवली :

          कणकवली नं.३ शाळेत सभा दुपारनंतर 4 वाजता सुरु झाली. तालुका सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी सर्व पदाधिकारी आणि शिलेदार यांचे *शाब्दिक स्वागत* केले. 

          तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर यांनी सभेचे *प्रास्ताविक* केले व सर्वांचे शाब्दिक स्वागत केले. त्यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. 

          तालुका सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी *मागील सभेचे इतिवृत्त* सविस्तर वाचून दाखवले. इतिवृत्त उत्तम लिहिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.मागील झालेला संपूर्ण जमाखर्च , संवर्धन निधी , वाढदिवस निधी याचे सविस्तर वाचन माजी तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले. याबाबत विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन पदाधिकारी यांनी केले. शिल्लक रकमेचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. 

          नूतन *उपक्रम शिष्यवृत्ती मार्गदर्शन* यावर चर्चा झाली. उपक्रम प्रमुखांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केलेली आहे. उपक्रमात सहभागी सर्व शिक्षक शिक्षिका शिलेदारांनी निवडलेल्या घटकांवर व्हिडिओ निर्मिती करण्यास आरंभ केलेला असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली. त्यावर पुढील कार्य करुन व्हिडीओ प्रसारित करण्याच्या दृष्टीने तयार ठेवावा असे सुचविण्यात आले. ज्या शिलेदारांची यात नावे आहेत त्यांनी आपल्या उपक्रम ग्रुपवर कार्यरत राहण्याविषयी चर्चा झाली. याविषयी एखादी ऑनलाईन मिटिंग घेण्याबाबत सूचना करण्यात आली.

          काही महिला सदस्यांची जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी तालुका पदांचे लेखी राजीनामे सादर केले. त्यावर सखोल चर्चा झाली. *रिक्त पदांवर नवीन महिलांची* निवड पुढील सभेत होऊ शकेल.

          लवकरच होणाऱ्या *शिक्षक पतपेढी निवडणुकीसंदर्भात* शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर , माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सभागृहाला संबोधित केले. यावर सखोल चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

          *शालेय गणवेश अनुदान* न मिळता वितरण केल्याबद्दल चर्चा झाली. याबाबत विविध ठिकाणी शासनाने आदेश काढल्यामुळे तात्पुरता समारंभपूर्वक कार्यक्रम संपन्न केल्याचे सांगण्यात आले. संघटनेने याबाबत वेळीच सूचना द्यायला हवी होती अशीही सूचना मांडण्यात आली. 

          *गॅस अनुदान निधीबाबत* ही प्रत्येक तालुक्यात वेगवेगळा निधी आणि कार्यवाही सुरु असल्याचे समोर आले. 

          *शिक्षक वाढदिवस निधी* चा उपयोग कशासाठी करावा यावर सविस्तर चर्चा झाली. अधिवेशनात झालेल्या खर्चाचे विवरण करण्यात आले. त्यातील भोजन वितरणावर अधिक चर्चा झाली. 

          *गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप* करताना यापुढे मुलांना चप्पल निधी देताना तो शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करण्याबाबत ठरविण्यात आले. 

          ज्या काही बाबी जिल्हा संघटनेच्या कक्षेत येत असल्याने त्याबाबत जिल्हा संघटनेला लेखी कळवण्यात येईल असे तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर यांनी सांगितले. 

          या सभेला बहुसंख्य पदाधिकारी व शिक्षक शिलेदार उपस्थित होते. चर्चेत बहुसंख्य शिलेदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शेवटी सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी सर्वांचे *आभार* मानले. 

🛑 तालुका प्रसिद्धी प्रमुख

यातील सविस्तर शब्दांकन पुढील सभेतील इतिवृत्तात प्रत्यक्ष समजेलच. हा विषयानुसार सारांश आहे. तरीही काही बाबींचा उल्लेख करावयाचा राहून गेला असल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करतो. 

🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏







गुरुवार, २ जून, २०२२

🛑 हार्दिक शुभेच्छा 🛑

 🛑 हार्दिक शुभेच्छा 🛑


          मा. शशिकांत कदम सर हे 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. कणकवली शाखेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर , तालुका सरचिटणीस मा. महेंद्र पवार , महिला आघाडी सचिव नेहा मोरे आणि फोटोतील पदाधिकारी समितीचे शिलेदार उपस्थित होते.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹










गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

🔸 जिल्हा महिला मेळावा 🔸

 शिक्षक समिती अपडेट

🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

          🔸 जिल्हा महिला मेळावा 🔸

👉🏼 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गचा जिल्हा महिला मेळावा रविवार दि 24 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत होणार.  

👉🏼 महिला मेळाव्याचे स्थळ कुडाळ येथील मराठा समाज सांस्कृतिक भवन 

 👉🏼 जिल्हा महिला कार्यकारणीसाठी तालुक्यातून पाच महिला सदस्य द्यायचे आहेत.( 5 महिला प्रतिनिधी देताना महिला आघाडी अध्यक्षा, सचिव वगळून नावे द्यायची आहेत.) 

 👉🏼 सर्व तालुका प्रत्येकी 5 महिला प्रतिनिधी, सर्व महिला आघाडी अध्यक्ष व सचिव, सर्व तालुकाध्यक्ष व सचिव, सर्व राज्य व जिल्हा पदाधिकारी यांची एकत्रित सभा 12 एप्रिल 2022 रोजी दु. 3 वा प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केली जाणार.  

👉🏼  या सभेत नूतन जिल्हा महिला आघाडी कार्यकारिणी निवडली जाणार.  

👉🏼 जिल्हा महिला मेळाव्यासाठी प्रत्येक तालुक्याने किमान 10 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचे आहेत. यामध्ये प्राधान्याने महिला भगिनींचा सहभाग असावा.तसेच शिक्षक बांधवांचाही सहभाग अपेक्षित आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

▪️ आपलेच▪️

श्री.टोनी म्हापसेकर- तालुकाध्यक्ष

श्री.महेंद्र पवार- सरचिटणीस

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली

बँक मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया यांची भेट

शिक्षक समिती कणकवली अपडेट

 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢

नमस्कार

          ५ एप्रिल २२ रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पगार खाती असलेल्या शिक्षकांच्या खाती पगार जमा होण्याच्या अनुषंगाने मान.बँक मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया यांची १:३० वाजता भेट घेण्यात आली.

          चेक बँक क्लिअरन्सला पाठवण्यात आलेला असून त्यासाठी कमीत कमी २/३ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत पगार बँक खाती जमा होतील, अशी माहिती बँक मॅनेजर यांनी दिली. 

         भेटीप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.टोनी म्हापसेकर, तालुका सरचिटणीस श्री.महेंद्र पवार, माजी तालुकाध्यक्ष तथा प्रवक्ता श्री. विनायक जाधव, कार्याध्यक्ष श्री. प्रशांत दळवी व श्री.सचिन सावंत हे उपस्थित होते.

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

तालुकाध्यक्ष - श्री. टोनी म्हापसेकर 

सरचिटणीस - श्री. महेंद्र पवार

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार 

          नुकतेच कणकवली शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले. कार्यक्रमाची पूर्वतयारी , सभा , प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ,  शिलेदारांनी दिलेला वेळ व योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. आपला सोहळा साजरा होत आहे ही प्रत्येक सदस्याच्या मनात असलेली भावना याला कारणीभूत आहे. स्वतःच्या घरातला सोहळा असावा तसे सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 
          आपली समिती ही पूर्वीपासूनच अशा धुरंधर शिलेदारांची खाणच आहे. त्यात आता महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे साथ द्यायला सुरुवात केल्यामुळे लढा भक्कम होत चालला आहे. सन १९६२ पासून स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला यंदा २०२२ साली साठ वर्षे पूर्ण होत आहेत या गोष्टीचा अत्यानंद आहे. 
          सकाळपासून त्रैवार्षिक अधिवेशनाची लगबग सुरु झाली होती. राज्याध्यक्ष उदय शिंदेसाहेब कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच उपस्थित झालेले दिसले. आपल्या शिलेदारांची होत असलेली धावपळ ते स्वतः बघत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले होते. कणकवली तालुका शाखेचे उपक्रम पाहून ते अतिप्रसन्न झालेले दिसले. शाखेच्या शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक कार्याची भलीमोठी यादी पाहून ते त्यावर भरभरुन बोलताना दिसले. त्यांनी कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांची विशेषतः तालुकाध्यक्ष , तालुका सरचिटणीस यांची पुनःपुन्हा नावे घेत  तोंड भरुन स्तुती केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच होते. म्हणूनच कणकवली शाखेचे उपक्रम राज्याला रोल मॉडेल ठरावेत असा त्यांनी पुनरुच्चार केला होता. 
          बासरीवादनाने कार्यारंभ झाल्याने सर्वांचे कान तृप्त झाले होते. दीपप्रज्वलन संपन्न होताना सर्वांच्याच चेहऱ्यावर भक्तिभाव फुलताना दिसला. त्याला जोड मिळाली ती महिला आघाडीने सादर केलेल्या ईश्वस्तवन व स्वागतपद्याची. सूर , लय आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधत वाद्यवृंदांनी दिलेली साथही अविस्मरणीय अशीच. 
          संपूर्ण प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी असताना सर्वांचेच लक्ष कार्यक्रमाकडेच होते , हातातल्या मोबाईलकडे नव्हते. कार्यक्रम चढत्या क्रमाने पुढे पुढे सरकत होता. राजेश कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे अक्षरशः खिळून राहिले होते. 
          सर्व मान्यवरांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी मुद्देसूद व भावणारे प्रास्ताविक सादर केले. त्यांच्या बोलण्यात विनम्रता होती. प्रत्येक उपक्रमाविषयी त्यांनी आपले अनमोल विचार मांडलेच , आणि व्यक्तींच्या नावांचाही उपक्रमानुरूप उल्लेख केला. सर्वांचीच नावे त्यांना घ्यायची इच्छा दिसत होती. म्हणूनच गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या अहोरात्र कामाची शाबासकी त्यांना राज्यात नक्की मिळेल असे राज्याध्यक्ष साहेबांनी सुचित केले आहे हीसुद्धा शाखेच्या उत्तम कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. 
          समितीचे पाईक असे आहेत की त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते आपले कार्य करीतच राहतात. सर्वसामान्य समिती शिलेदार म्हणूनच अधिक श्रेष्ठ ठरतो अशी प्रत्येक शिक्षक नेत्यांची निर्मळ भावना असते. समिती शिलेदारांच्या रोमारोमात " त्याग आणि सेवा " वास करत असते. समितीच्या सानिध्यात आल्यानंतर समजते की समिती काय चीज आहे ते ? न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगत समितीचे शिलेदार नेहमीच संघटनात्मक कार्य करण्यात अग्रस्थानी असतात. 
          विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना मुलांचा प्राधान्याने विचार केला तो समितीने. मुलांसाठी गाऊ आनंदे , लेट्स लर्न इंग्लिश , राष्ट्रभक्तीपर गीतगायन , खजिना कथांचा , कलांकुर असे अनेक अभिनव नवोपक्रम राबवले. सर्व बंधू भगिनींना सहभागी करुन घेतले. अभ्यासपूरक व ऑनलाईन उपक्रमांमुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास प्रवृत्त झाले. बावीस केंद्रातील गरीब होतकरु मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देतानाही समितीचे दातृत्व लक्षात येते. कोविडमुळे अकाली निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना तातडीची रोख मदत देऊन ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' हा दिलेला दिलासा मानसिक आधार देणारा होता. मोफत शिष्यवृत्ती सराव  परीक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे बळ विद्यार्थ्यांना नेहमीच दिले आहे. क्रीडास्पर्धेत खेळताना जखमी झालेल्या मुलांना तातडीची मदत करण्याचे व्रत समितीने अंगिकारले आहे , त्यामुळे आकस्मिक निधी मिळून मदतीचा हात मुलांना , पालकांना प्रासंगिक सहकार्याचा ठरतो आहे. अशा प्रकारे शैक्षणिक , सामाजिक कार्य करत असताना शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवले जात आहेत. चेकपोस्टवर ड्युटी असताना समिती सदैव शिक्षकांच्या सोबत राहिली आहे. ऑक्सिजन प्लँट सारख्या मोठया आर्थिक घडामोडीत भरीव मदत करणारी समितीची सिंधुदुर्ग शाखा सामाजिक भान जपणारी संघटना ठरली आहे. 
          विविध तालुक्यांमध्ये समितीने अनेक माध्यमातून विद्यार्थी , पालक यांचे हित जपणारे उपक्रम नेहमीच राबवले आहेत. शिक्षकांच्या सांस्कृतिक , शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम , समितीचे दशावतारी कलाकार घेऊन नाटके सादर केली आहेत. समितीने अशी विविध रत्ने असलेले अवतारी शिक्षक निर्माण केले आहेत. समितीतील शिक्षक शिलेदारांची ही शैक्षणिक धडपड बघून कधी कधी वाटते , देवाने यांना शिक्षक रूपाचा अवतार घेऊन पृथ्वीतलावर पाठवले असावे. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...