शिक्षक समिती कणकवली आयोजित एक इंग्रजी विषयाचा (विशेष करून व्याकरण ) उपक्रम : English Grammer Activity
प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या घाईत इंग्रजी व्याकरणाकडे दुर्लक्ष होतो .
मुलांचा व्याकरणाचा भाग पक्का व्हावा याकरीता शिक्षक समिती कणकवली शाखा चार ते पाच मिनिटाचा पीपीटीचा वापर करून इंग्रजी व्याकरणाच्या घटकांचे व्हीडीओ तयार करणार आहे.
या उपक्रमाचे प्रमुख म्हणून श्री . संतोष कुडाळकर व श्री . प्रदिप मांजरेकर सर काम पाहणार आहेत .
या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी आपली नावे श्री . संतोष कुडाळकर सर यांना कळवावीत .
🎯 उपक्रमात सहभागी होणारी व्यक्ती शिक्षक समितीची सदस्य असावी .
🎯 उपक्रमातील सहभाग हा कणकवली तालुका मर्यादित आहे .
सर्व समिती शिलेदारांच्या सहकार्याने हा उपक्रम आपण निश्चितच यशस्वी करू ,असा विश्वास आहे .
****************************
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
शाखा कणकवली
****************************