कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या
नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली तालुका यांच्यावतीने आज, शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी शाखेच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्य महासचिव राजन कोरगावकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कणकवली पंचायत समितीच्या अगदी समोर असलेल्या या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी समितीचे 80 ते 85 शिलेदार उपस्थित होते. शाळा सुटल्यानंतर लगेचच सर्व शिलेदार नवीन कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले आणि वेळेत पोहोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाचा आनंद स्पष्ट दिसत होता. महिला शिक्षिका वर्गांनीही मोठ्या उत्साहाने आणि बहुसंख्येने आपली उपस्थिती दर्शवली.
उद्घाटक महासचिव राजन कोरगावकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हार्दिक स्वागताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आदरणीय कै. भा. वा. शिंपी गुरुजी आणि आदरणीय कै. जॉन दियोग रॉड्रीग्ज गुरुजी यांच्या पवित्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शिक्षक नेते टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने समिती शिलेदारांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी स्वतः तालुकाध्यक्ष असताना केलेल्या कामाचा आढावा घेतला. तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रवीण कुबल यांनी 'शिक्षक ज्योत' या मासिकाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. दरमहा शिक्षकांच्या सहकार्याने हे मासिक प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आणि समितीच्या शिलेदारांना संघटनात्मक व शैक्षणिक लेख लिहिण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या शुभहस्ते जून 2025 चा 'शिक्षक ज्योत'चा पहिला अंक समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात आला. हा अंक डिजिटल स्वरूपात समितीच्या सर्व ग्रुपवर पाठवण्याची विनंतीही करण्यात आली.
कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांनी राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, राज्य प्रतिनिधी नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, आणि राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यासाठी 'तरुण भारत' आणि 'कोकण नाऊ' या प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य कार्यकारणी सदस्य नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, संतोष परब, माजी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, महेंद्र पावसकर, किशोर कदम, मालवण तालुकाध्यक्ष जीवन हजारे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, उपाध्यक्ष धीरज हुंबे, रुपेश गरुड, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी निकिता ठाकूर, जिल्हा महिला संघटक विनिता शिरसाट, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष ऋतुजा जंगले, संचालक प्राथमिक शिक्षक पतपेढी कणकवली श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे, जिल्हा सल्लागार संदीप गोसावी, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष किशोर गोसावी, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, कार्याध्यक्ष संतोष कांबळे, कोषाध्यक्ष सचिन सावंत, कार्यालयीन चिटणीस सुभाष गावकर, प्रवक्ते विजय पाताडे, संपर्कप्रमुख दिनेश जंगले, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुबल, अंतर्गत हिशोब तपासणी नंदकुमार सरंगले, उपाध्यक्ष संदीप ब्रह्मदंडे, जगन्नाथ घाडेगावकर, सल्लागार संजय तांबे, शिवाजी मडव, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कडूलकर, अजय सावंत, देहू होळकर, सुनील गावकर, श्रीकांत बुचडे, शिक्षिका नेहा मोरे, कार्याध्यक्ष कविता बुचडे, कोषाध्यक्ष आरती कांबळी, कार्यालयीन चिटणीस सविता आर्लेकर, प्रवक्त्या मयुरी राणे, संपर्कप्रमुख रश्मी आंगणे यांसह समितीचे अनेक शिलेदार उपस्थित होते.
हा उद्घाटन सोहळा शिक्षक समितीच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा आणि संघटनात्मक ऐक्य दर्शवणारा ठरला.




























































































































































































कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा