सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

🔷 शिक्षकांच्या मुख्यालय सक्तीचा आदेश आता कोर्टात.....

🔷 शिक्षकांच्या मुख्यालय सक्तीचा आदेश आता कोर्टात..... 

🎯 पहिल्या सुनावणी अंती राज्य सरकारला न्यायालयाने बजावली नोटीस.....

शिक्षक समितीने दाखल केलीय औरंगाबाद खंडपीठात याचिका...

🔴 औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी (ZP Teachers, Employees) मुख्यालयी (हेअदार्टर) राहण्याचा आदेश वादात सापडला आहे. या बंधनाविरोधात शिक्षकांनी हायकोर्टाचा (High Court) दरवाजा ठोठावला आहे. गावातील मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव, आजारपणातील सोयी-सुविधा पाहता हा आदेश कितपत योग्य ठरतो यावर युक्तीवाद करण्यात आला.

          शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Bombay High Court Aurangabad Bench) याचिका (Petition) दाखल केली आहे. न्या. रविंद्र व्ही. घुगे आणि न्या. संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठाने सुनावणीअंती राज्य सरकारला नोटीस (Notice) बजावली आहे. प्रकरणात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा उस्मानाबाद  शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी अॅड.सईद एस. शेख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

          यापूर्वी राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मंजूर करताना कामाच्या ठिकाणी राहण्याची अट शिथिल केलेली होती, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

          तर आता 7 ऑक्टोबर 2016 आणि 9 सप्टेंबर 2019 रोजीच्या आदेशाने सरकारने मुख्यालयी राहणे अनिवार्य केले आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

          शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय घरे अथवा क्वार्टर उपलब्ध असतात. परंतु जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अशी सुविधा देण्यात येत नाही. अनेक शाळा दुर्गम भागात, वस्ती, तांड्यावर असतात. तिथे स्थानिक लोकांचीही घरे पक्की नसतात.

          तसेच अनेक खेडे गावात राहण्याच्या, पाण्याच्या, आरोग्याच्या, दळणवळणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी अशा ठिकाणी राहणे अशक्य आहे.

          जर पती-पत्नी दोन्ही शासकीय सेवेत असेल तर कोण मुख्यालयी राहणार याविषयी शासनाने काहीच स्पष्ट माहिती दिली नाही, असा युक्तीवाद सुनावणीदरम्यान करण्यात आला.

          सुनावणीअंती औरंगाबाद खंडपीठाने वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. 28 नोव्हेंबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल.



शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसाठी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन...

 


तुमच्याकडून केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते : शिक्षक समिती

🩸रक्तदान शिबीर🩸

शिक्षक समिती कणकवलीचा उपक्रम

कणकवली : दिनांक 31 ऑक्टोबर 2022

          सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान ,  कणकवली येथे सकाळी ९ . ०० वा. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा असे शिक्षक समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

अध्यक्ष / सचिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली



गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक समितीचा मदतीचा हात :

सामाजिक बांधिलकी जपत शिक्षक समितीचा मदतीचा हात

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

          जि.प.शाळा ओझरम नं.१ चा इयत्ता ४ थी तील विद्यार्थी कु.अर्णव आत्माराम खाडये आणि जि.प. शाळा ओटव नं.१ ची विद्यार्थिनी कु.लाजरी संदीप खांबाळकर हे खेळताना पडल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. सदर विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने ओझरम नं.१ चे पदवीधर शिक्षक श्री.विनायक जाधव ( प्रवक्ता ) तसेच ओटव नं.१ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सुजाता टिकले ( जिल्हा संघटक ) यांचे जवळ या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रु.5000/- एकूण रु.10,000/- ची आर्थिक मदत सुपुर्द करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य शिक्षक समिती कणकवलीने केले. 

           सदर प्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.टोनी म्हापसेकर, सरचिटणीस श्री.महेंद्र पवार, माजी कार्याध्यक्ष तथा सल्लागार श्री.संतोष तांबे, महिला आघाडी कोषाध्यक्ष श्रीम.सारिका पवार आदी उपस्थित होते.

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

              अध्यक्ष /सचिव 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

             शाखा कणकवली






🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...