वृक्षारोपण उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वृक्षारोपण उपक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ जुलै, २०२२

वृक्षारोपण उपक्रम 2022

 


🛑 शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न

 🛑 शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न

        ' न्यायाची चाड व अन्यायाची चीड ' हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

         २२ जुलै २०२२ रोजी शिक्षक समितीच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुका शाखा कणकवलीच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा जानवली मारुती मंदिर येथे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम व इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक समिती कणकवली सातत्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिक्षक समिती कणकवली ने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ केला. समितीच्या अनेक उपक्रमशील शिक्षक सदस्यांच्या सहकार्यातून शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या व्हिडिओची निर्मिती करून ते व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला यूट्यूब चैनलवर प्रसारित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्व विद्यार्थी - शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.

            या कार्यक्रमाला तालुका शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप धामापुरकर, प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष कुडाळकर, अजय तांबे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, उपाध्यक्ष सदानंद ठाकूर, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, महिला आघाडी सचिव नेहा मोरे, कार्यालयीन चिटणीस समीर पाटील, सहसचिव संतोष कांबळे, विभाग अध्यक्ष हेमंत राणे, प्रसिद्धीप्रमुख प्रविण कुबल, कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणारे जानवली मारुती मंदिर शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर, उपक्रमशील शिक्षिका मंजिरी मराठे, सुजाता साटविलकर, राजेश कदम, सुशांत मर्गज, सचिन सावंत, संदीप जाधव, संदीप गोसावी, स्नेहल गोसावी, श्रीकृष्ण कांबळी आदी समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले.








































शुक्रवार, २३ जुलै, २०२१

🌴 वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न






महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

कणकवली तालुका शाखेचा उपक्रम 

२२ जुलै या वर्धापन दिनाचे औचित्य

हळवल दिनांक : २२ जुलै २०२१

      ' झाडे लावा , झाडे जगवा ' चा संदेश देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती कणकवली शाखेच्या शिलेदारांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हळवल येथे संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभहस्ते कल्पवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण केले.

          त्यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सचिव सुशांत मर्गज, कार्याध्यक्ष संतोष तांबे , शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकृष्ण कांबळी , विभागीय उपाध्यक्ष दिलीप धामापूरकर, समिती ज्येष्ठ सदस्य राजेंद्र गोसावी, श्वेता मेस्त्री , महिला केद्र संघटक श्रेया ठाणेकर , शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ अनंत राणे , हळवलचे सामाजिक कार्यकर्ते धुरी आदी  प्रामुख्याने उपस्थित होते.

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...