गुरुवार, १३ मार्च, २०२५

17 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्गनगरीत गर्दीने उच्चांक गाठलेला दिसायला हवा.

⭕महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची आंदोलनाची हाक 


🔸तळेरे विभागात सहविचार सभेला बहुसंख्य समितीचे पाईक उपस्थित* 


 🔹सर्व पदाधिकाऱ्यांनी केले हृदय आवाहन


खारेपाटण : 


          15 मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने कंबर कसली आहे. राज्यभरात सर्व जिल्ह्यात सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी शिक्षक समितीचे सर्व पाईक शिलेदार आपापल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी आवाज उठवणार आहेत. त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. 

          आपल्या शिक्षक बांधवांवर जेव्हा केव्हा आंदोलन करण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा होणारे आंदोलन बहुसंख्येने होत असते याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असेल. पण हल्ली अनेकदा आंदोलने करावी लागतात म्हणून कि काय, रोज मरे त्याला कोण रडे असं अजिबात समजून चालणार नाही. 

          अन्यायाची चीड आहे ना, मग आता मागे राहून कसे चालेल ?  न्यायाची सदैव चाड बाळगणारे आम्ही अजिबात डिस्चार्ज होऊन चालणार नाही. गेली कित्येक वर्षे आपली संघटना विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शिक्षण यांचाच विचार करुन लढा देण्याचे कार्य करते आहे. आपण त्याचा भाग होऊन संघटनेला एका अत्युच्च उंचीवर नेऊन ठेवण्याचे महत्वाचे कार्य केलेले आहे. आपल्याला गरज असते, तेव्हाच आपण संघटनेला जवळ करणार असू तर मात्र कठीण आहे. संघटना म्हणजे आपण सर्वजण आहोत. आपण एकटे नसलो तर संघटनेला काय फरक पडणार आहे असे म्हणणे चुकीचे आहे. असे अनेकांनी म्हटले तर संघटनेची ताकद कमी कमी होत जाणार हेच शासनाला अपेक्षित आहे. त्यांचं फावलं तर तेच त्यांना हवं आहे. पण आपण त्यांना तसं होऊ द्यायचं नाहीय. कितीही काहीही झालं तरी आपल्याला आता निकराने लढा देण्याशिवाय अजिबात पर्याय नाही. म्हणून आपण सर्वांनी मिळून शासनाला आपली एकी दाखवून देण्याची वेळ आली आहे. 

          आपल्या अनेक मागण्या मान्य होण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा लढावं लागेल, आता धडाकेबाज होऊन धुमधडाका करत राहायला हवा. आपल्या मागण्यांचे फटाके सतत फुटत राहायला हवेत. फुसक्या फटाकेवाले आपण नाही आहोत. आपण जबरदस्त नेतृत्व बाळगणारे प्रामाणिक शिलेदार आहोत. त्यामुळे आता घरी बसून whats app वर काय चाललंय ते बघून चालणार नाही. प्रत्यक्ष आंदोलनाच्या युद्धात सहभागी झाल्याशिवाय गत्यंतर नाही. 

          जागतिक महिला दिन नुकताच साजरा झाला. आपल्या शिक्षिका भगिनी महिलांनी या आंदोलनास नेहमीपेक्षा जास्त साथ दिली तर खऱ्या अर्थाने आपला लढा तीव्र होणार आहे. 

          सकाळची शाळा करुन दुपारच्या आंदोलनासाठी सर्व पुरुष सदस्य आणि महिला सदस्या यांनी ठरवले तर ते सर्वजण येऊ शकतात. सेवानिवृत्त झालेले शिक्षक पदाधिकारी देखील यात सहभागी होतील. नुकतेच नोकरीला लागलेले शिक्षण सेवकही यांत सामील होणं गरजेचं आहे. ही सर्वांचीच लढाई आहे. पदवीधर शिक्षक अतिरिक्त होणार एवढेच आपल्याला समजले आहे. परंतु ही सुरुवात आहे. हळूहळू उपशिक्षक अतिरिक्त होणार हे कळण्याइतका आपला सर्वांचाच अभ्यास झालेला आहे. 

          उठा, जागे व्हा. आता तुम्ही प्रत्येकाने बाहेर पडा. कोण बाहेर पडतो बघूया असे अजिबात म्हणू नका. तुम्हाला तुमची अस्मिता बोलावते आहे. 17 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्गनगरीत गर्दीने उच्चांक  गाठलेला दिसायला हवा. आणि हो, सर्वांनी आंदोलनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत थांबायला हवं हेही तितकंच खरं आहे. 

          दुपार असणार आहे. उन्हे मी म्हणणार आहेत. तरीही आपण न डगमगता निसर्गाला आणि दु :शासनाला पार करण्याची तयारी करायला हवी. नाहीतर खूप कठीण आहे असं म्हणत भाजत राहायचं का ? तुम्ही या सगळे. मीही येतोय. सगळ्यांचे फोटो काढायचे आहेत. मोबाईल हँग झाला तरी चालेल, आपल्याला हँग व्हायचे नाही हे नक्की. 


🔹 तालुका प्रसिद्धी प्रमुख

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, शाखा : कणकवली तालुका

































शनिवार, ८ मार्च, २०२५

सन्मान मातांचा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली,महिला आघाडी तर्फे आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सन्मान मातांचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी डॉ. अशोक नारकर, सिस्टर श्रीम. प्रिया कदम, तालुकाध्यक्ष सन्मा.टोनी म्हापसेकर, सचिव संतोष कांबळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सन्मा.निकिता ठाकूर, पतपेढी उपाध्यक्ष ऋतुजा जंगले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेहा मोरे, जिल्हा प्रवक्ता विनायक जाधव, महिला आघाडी तालुका सचिव विनिता शिरसाट, जिल्हा सल्लागार संदीप गोसावी, सुभाष गावकर,सारिका पवार,कविता पावसकर, स्नेहा गोठणकर, अनुजा कदम, सुप्रिया महाजन,सविता आर्लेकर इत्यादी उपस्थित होते.

      नवजात बालकांच्या मातांना फळे व ड्रायफ्रूट्स यांचे वाटप करण्यात आले.

 सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏













शनिवार, १ मार्च, २०२५

रक्तदान शिबिराला उत्साहपूर्ण प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना भालचंद्र महाराज  संस्थान चे व्यवस्थापक श्री. विजय केळुसकर, अध्यक्ष टोनी म्हापसेकर, सचिव कांबळी,संचालक श्रीकृष्ण कांबळी सोबत समिती पदाधिकारी मान्यवर





































































































































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...