🔴 कणकवलीत शिक्षक समितीचा गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न; पुढील वर्षीपासून दरवर्षी पाच विद्यार्थी दत्तक घेणार - उपसभापती राजेश सावंत
कणकवली (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा-कणकवली यांच्या वतीने आयोजित 'दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२६' नुकताच मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले, तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती राजेश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक समितीच्या 'शिक्षण ज्योत' या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. धीरज हुंबे यांनी समितीचा वार्षिक कार्य अहवाल सादर करून वर्षभरातील उपक्रमांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
🔹 मान्यवरांचे मार्गदर्शन:
सभापती हर्षदा वाळके यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षक समितीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समिती राबवत असलेले उपक्रम दिशादर्शक आहेत. भविष्यात शिक्षकांनी 'प्लास्टिकमुक्त शाळा' आणि 'जलसाक्षरता' या विषयांवर विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन करून त्यांना पर्यावरण स्नेही बनवावे," असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी उपसभापती राजेश सावंत यांनी शिक्षकांच्या दातृत्वाची प्रशंसा केली. "शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली दत्तक पालक योजना कौतुकास्पद आहे. या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढील वर्षीपासून मी स्वतः दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेईन," असा मानस त्यांनी बोलून दाखवला.
🔸 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व आणि गौरव:
शिक्षक समितीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत तालुक्यातील २२ गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्वासाठी निवड करण्यात आली. यामध्ये आरुषी जाधव, वैदेही चव्हाण, परिणीती बोर्डेकर, वेदा वायंगणकर, जेसिका फर्नांडीस, गायत्री नानचे, श्रुती जाधव, रेवती दळवी, शनया गुरव, कैवल्य राणे, हर्षद साळसकर, भाग्यश्री मेस्त्री, मनस्वी धुळे, हार्दिक उरणकर, सार्थक देसाई, पूर्वा बागवे, देवांश गुरव, कार्तिक कदम, जान्हवी राठोड, अर्पित कोल्हेकर, स्वराज मांडवकर आणि आर्यन कासार्डेकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ५ वी शिष्यवृत्ती धारक: अर्णव भिसे, गौरांग वायंगणकर, शुभम गावडे, रचिता सदडेकर, लावण्या सावंत, पार्थ गुरव, विभा धुमाळे, मयंक बुचडे. ८ वी शिष्यवृत्ती धारक: उत्कर्ष परब, अथर्व सावंत, सोहम नातू. नवोदय निवड: रचिता सदडेकर, हृदवंश गुरव, पार्थ गुरव, ओम पवार, मृण्मयी ब्रम्हदंडे, गौरांग वायंगणकर, महालक्ष्मी मेस्त्री, हेरंब चव्हाण, विभा धुमाळे, सुप्रबुद्ध पाटणकर, देवेश तेली. तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने देवेन पाटील, चैतन्य गवाणकर, मंदार जाधव, विराज कल्याणकर, अन्वय देसाई, गाथा कांबळे यांचा गौरव झाला. सराव परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या चैतन्य गवाणकर याचाही विशेष सन्मान करण्यात आला.
🔹 क्रीडा व शालेय यश:
क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेले स्वरा जाधव, मनस्वी अपराध, आराध्य सावंत, समिक्षा गांवकर, अनय पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परसबाग स्पर्धेत साळिस्ते नं. १ आणि 'मुख्यमंत्री माझी शाळा' अभियानात खारेपाटण नं. १, करंजे नं. १ व तळरे नं. १ या शाळांना सन्मानित करण्यात आले.
🔸 सेवानिवृत्तांना सन्मान:
तालुक्यातील विद्या पेडणेकर, सुनील तांबे, श्रद्धा बोभाटे, स्मिता कदम, अभय वालावलकर, स्वाती कदम, शरद कदम, स्नेहा गोठणकर, स्मिता कदम, अंबाजी रासम, मृणाली पिसे आणि राधिका सावंत या १२ सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला राज्य व जिल्हा पदाधिकारी महासचिव राजन कोरगावकर, शिक्षकनेते भाई चव्हाण, सचिन मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज यांनी प्रास्ताविक केले. रश्मी आंगणे आणि ज्योत्स्ना गावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर निलेश ठाकूर यांनी आभार मानले. लकी ड्रॉने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.