गुरुवार, ३१ मार्च, २०२२

विषय नियामक सभा : 31 मार्च 22 : संक्षिप्त वृत्त

🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा : तालुका कणकवली

🛑 सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

🛑 तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी सभेचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी गेल्या वर्षात केलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. तालुका व जिल्हा संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम राबवता आले. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

🛑 विषय क्र. १ ) मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे. 

मागील नियामक सभेचे इतिवृत्त सविस्तर वाचून दाखवण्यात आले.

त्यावर साधक बाधक चर्चा झाली. 

🛑 विषय क्र. २ ) मागील जमाखर्चाचा हिशेब मंजूर करणे. 

मागील सभेपासून झालेल्या खर्चाचे सविस्तर वाचन करण्यात आले. मंजुरी घेण्यात आली. त्रैवार्षिक अधिवेशन संभाव्य खर्च , संवर्धन निधी , सभासद निधी , वाढदिवस निधी , ऑक्सिजन प्लँट निधी , व्याज, मुदत ठेव इत्यादींबद्दल सविस्तर सांगण्यात आले. 

🛑 विषय क्र. ३ ) अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या मागण्या व ठराव निश्चित करणे :

मागण्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. नवीन काही मागण्या सुचविण्यात आल्या. त्यानंतर आयत्या वेळेचे विषय घेण्यात आले.

तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव  व तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी आभारपर मनोगत व्यक्त केले. शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस यांनी मावळत्या कार्यकारिणीला धन्यवाद दिले. 

🛑 विषय क्र. ४ ) नवीन कार्यकारिणी गठित करणे. 

प्रमुख उपस्थिती : जिल्हा निरीक्षक

मा. चंद्रसेन पाताडे , मा. नारायण नाईक ( जिल्हा पदाधिकारी )

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली 

🌀 तालुका कार्यकारिणी 🌀

🛑 शिक्षक नेते - श्री. गिल्बर्ट फर्नांडिस

🛑 तालुकाध्यक्ष - श्री. टोनी म्हापसेकर

🛑 सरचिटणीस - श्री. महेंद्र पवार

🛑 कार्याध्यक्ष - श्री.दिलीप धामापुरकर

                       श्री. प्रशांत दळवी

🛑 कोषाध्यक्ष - श्री. महेश चव्हाण

🛑 प्रवक्ता - श्री. विनायक जाधव

🛑 प्रसिद्धी प्रमुख - श्री. प्रवीण कुबल

🛑 कार्यालयीन सचिव - श्री. समीर पाटील

🛑 सहसचिव - श्री. संतोष कांबळे

🛑 संपर्क प्रमुख - श्री. प्रशांत बोभाटे

🛑 तालुका उपाध्यक्ष

🛑 तळेरे प्रभाग - श्री.अनिल खोत

🛑 कणकवली प्रभाग - श्री. राजेंद्र कडुलकर

🛑 हुंबरट प्रभाग - श्री. गौतम जाधव

🛑 फोंडा प्रभाग - श्री. धीरज हुंबे

🛑 कनेडी प्रभाग - श्री. संदीप तांबे

🛑 विभाग अध्यक्ष : 

🛑 तळेरे प्रभाग - श्री. दिनेश जंगले

🛑 कणकवली प्रभाग - श्री. प्रमोद पवार

🛑 बिडवाडी प्रभाग - श्री. संतोष सातवसे

🛑 फोंडा प्रभाग - श्री. हेमंत राणे

🛑 कनेडी प्रभाग - श्री. मंगेश लाड

🛑 तालुका संघटक - श्री.दिनेश सुद्रिक , श्री.जगन्नाथ घाडीगावकर

🛑 अंतर्गत हिशेब तपासणीस  : श्री.सुनील गणपत कदम

🛑 केंद्र संघटक

खारेपाटण - श्री.अमोल तुपविहीरे, शेर्पे - श्री.आशिष दुधे, साळीस्ते- श्री.ज्ञानेश्वर परदेशी, कासार्डे - श्री.बालाजी फड, कणकवली - श्री.श्रीकांत बुचडे, बोर्डवे - श्री.दिलीप कदम, हळवल - श्री.राजेंद्र गोसावी, वागदे - श्री.सचिन सावंत, कळसुली - श्री.विलीस चोडणेकर, बिडवाडी - श्री.संतोष पाटील, जानवली - श्री.उमेश मोरे, सावडाव - श्री.मनोज पिळणकर, नांदगाव - श्री.मंचक कोरडे, डामरे तिवरे - श्री. राजेंद्र कवडे, हरकुळ खुर्द- श्री.श्रीकृष्ण ठाणेकर, फोंडा- श्री.देऊ होळकर, पियाळी - श्री.संदीप जाधव, घोणसरी - श्री.जयप्रकाश सावंत, नरडवे - श्री.अमोल वावरे, नाटळ - श्री.नितीन सातवसे, भिरवंडे - श्री.श्रेयस तायशेटे, हरकुळबुद्रुक - श्री.भारत धनवे

🛑 सल्लागार

 श्री.संतोष तांबे, श्री.प्रदिप श्रावणकर, श्री.श्रीकृष्ण कांबळी, श्री.सुनील गावकर, श्री.संदीप गोसावी, श्री.शिवाजी मडव, श्री.प्रदीप मांजरेकर, श्री.सत्यवान घाडीगावकर, श्री.विजय मेस्त्री, श्री.आनंद तांबे, श्री.सदानंद ठाकूर.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नियामक सभा संपन्न झाली. 


































































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...