सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

🛑 कणकवली महिला मेळावा म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा : महिला राज्याध्यक्षा वर्षाताई केनवडे

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा : कणकवलीच्या महिला आघाडीचा उपक्रम

🟡 कणकवली : 

          कणकवली तालुका शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. महिला सेलने राबवलेला मेळावा म्हणजे महिलांसाठी पर्वणी असून एक अभूतपूर्व सोहळा पाहण्याचे भाग्य सर्व महिलांना लाभले असे आनंदोद्गार राज्याच्या महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे यांनी मराठा मंडळ कणकवली येथे बोलताना काढले.

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुका शाखेचा महिला मेळावा नुकताच महिला  तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर यांच्याअध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला आपल्यातून निघून गेलेल्या थोर विभूतींसाठी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन केले. महिलांनी सुरेल आवाजात वसुंधरा गीताचे स्तवन केले. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचे सन्मानगीत गायन करण्यात आले. सावित्रीबाई फुले , रॉड्रिग्जगुरुजी, भा. वा. शिंपीगुरुजी , कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व मान्यवर यांनी महिला मेळाव्याविषयी विशेष गौरवोद्गार काढले. कार्यक्रमासाठी राज्य महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे , शिक्षक नेते भाई चव्हाण , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जिल्हाध्यक्ष नितीन कदम , राज्य महिला सल्लागार सुरेखा ताई कदम ,जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , प्रवक्ते सुनिल चव्हाण , शिक्षक नेते नंदकुमार राणे , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे , कोषाध्यक्ष लहू दहिफळे , शिक्षक बॅंक उपाध्यक्षा निलम बांदेकर , संचालक आनंद तांबे , शरद केनवडे , कुडाळ महिला अध्यक्षा संगिता राऊळ , कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव , कणकवली तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज , महिला तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर , महिला तालुका सचिव नेहा मोरे , माजी अध्यक्षा ,वृषाली सावंत , माजी सचिव रश्मी आंगणे ,सुजाता टिकले, कल्पना मलये , निलेश ठाकूर , पियुषा प्रभूतेंडुलकर , मालवण तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर , शशांक आटक , साटविलकर , श्रीकृष्ण कांबळी , महेंद्र पवार , सानिका मदने , संदीप गोसावी , टोनी म्हापसेकर , सिने अभिनेते अभय खडपकर , सुप्रिया म्हसकर , ऋजुता जंगले , गजानन टक्के , गुलाब कुवर , प्रकाश झाडे , सोमनाथ शेंगाळ ,  सत्यवान घाडीगांवकर , संतोष तांबे , कोकण नाऊचे पत्रकार मयूर ठाकूर , अमित हर्णे , गंगावणे , सिने अभिनेते दिनेश पाटील , प्रतिभा कोतवाल , पुजा शंकरदास , राजा कडुलकर , स्वराशा कासले , प्रियांका सावंत , रुपेश गरुड , महिला मदत केंद्राच्या रोजा खडपकर आणि तालुक्यातील तमाम महिला शिक्षिका व शिक्षक शिलेदार उपस्थित होते.

          सकाळ सत्रात मानसशास्त्र अभ्यासक पियुषा प्रभूतेंडुलकर यांनी " महिलांना येणारा ताणतणाव आणि त्याचा सामना कसा करावा " यावर उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर रोजा खडपकर यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. 

          दुपार सत्रात महिलांचे फनिगेम्स घेण्यात आले. त्याचे सूत्रसंचालन दिनेश पाटील आणि तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी केले. त्यावेळी संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आल्या. मेणबत्ती पेटविणे - अनुक्रमे स्वराशा  कासले , रसिका कदम ,   विशाखा काणेकर , बादलीत नाणे टाकणे - अनुक्रमे प्रणाली पाळेकर , आरती कांबळी , सुनिता तांबे यांनी क्रमांक प्राप्त केले. 

          तसेच बाटलीत रिंग टाकणे - अनुक्रमे सुप्रिया शेंगाळ , प्रियजा राऊत , सुजाता साटविलकर तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत महिला समिती रत्न २०२२ विजेत्या सरिता पाटकर ,  प्रांजली मसुरकर या ठरल्या. सकाळ सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना चव्हाण यांनी केले. महिला तालुका सचिव नेहा मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी 10 लकी ड्रॉ विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजाता टिकले , कल्पना मलये व संपूर्ण महिला कार्यकारणी यांनी विशेष मेहनत घेतली.







































































































          























🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...