शिक्षक समितीने केले नूतन जि. प. अध्यक्षांचे अभिनंदन
कणकवली तालुका शाखेच्या वतीने दिल्या शुभेच्छा
कणकवली दिनांक : २६ मार्च २०२१
नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांची अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली तालुका शाखेच्या वतीने हृदय स्वागत करण्यात आले. अध्यक्षा संजना सावंत यांच्या घरी जाऊन शिक्षक समितीच्या शिलेदारांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
त्तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी नव्या अध्यक्षा संजना सावंत यांचे शाब्दिक स्वागत करुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बुके देऊन संघटनेच्या वतीने अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम, शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज , महिला सेलच्या तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर , महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे आणि तमाम तालुका आणि जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत हे देखील त्यावेळी उपस्थित होते. नूतन अध्यक्षा संजना सावंत प्राथमिक शिक्षक समितीच्या भावपूर्ण अभिनंदनाने भारावून गेल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही त्या म्हणाल्या.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा