वैद्यकीय पथकासोबत करावयाच्या ड्युटीचा कालावधी कमी करणेबाबत तहसिलदार यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेची मागणी
कणकवली दिनांक : २१ एप्रिल २०२१
मार्च २०२० मध्ये कोविड प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आजपर्यंत शासनाच्या वतीने कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना शाळा विलगिकरण, चेकपोस्ट ड्युटी , रेल्वेस्टेशन या ठिकाणी नियुक्त्या देऊन कामकाज करुन घेण्यात येत आहे.
त्यावेळी सर्व शिक्षकांनी कर्तव्यभावनेने प्रामाणिकपणे काम केलेले आहे आणि यापुढेही करणार आहेत. सध्या कोविड प्रादुर्भाव वाढत असून शासन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. या सर्व कामी प्राथमिक शिक्षक सर्वतोपरी सहकार्य करतच आहोत.
तहसिलदार कणकवली यांनी प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय पथकासोबत कामकाज पाहण्यासाठी १९ एप्रिल ते १९ मे असा एक महिन्याचा सलग आदेश कार्यान्वित केलेला आहे. हा कालावधी ८ ते १० दिवसांचा केल्यास सर्व शिक्षकांना यात सहभागी होता येणार आहे व कोविड प्रतिबंधात्मक कार्यात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
म्हणूनच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन आग्रहपूर्वक मागणी करण्यात आली आहे.
त्यावेळी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष विनायक जाधव, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, जिल्हा विभागिय अध्यक्ष महेंद्र पवार, संदीप गोसावी, प्रवीण कदम, प्रमोद पवार, अमित हर्णे, श्रीकृष्ण ठाणेकर, राजेंद्र कडुलकर हे समितीचे शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते. मागणी केल्यानंतर तहसीलदार कणकवली यांनी मागणीप्रमाणे१० दिवस ड्युटी देण्याचे मान्य केल्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा