गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

किती नागरिकांनी झेंडे फडकवले याचा अहवाल शिक्षकांनी देण्यासंदर्भात गटविकास अधिकारी यांची घेतली समितीने आकस्मिक भेट

आकस्मिक भेट

 

          स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत काही ग्रामपंचायती कडून शिक्षकांना घरोघरी जाऊन झेंड्याचं वितरण करणे तसेच 13 तारीखला गावात सर्वे करून किती नागरिकांनी झेंडे फडकवले याचा अहवाल देण्यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून लेखी आदेश देण्यात आले आहेत. या माध्यमातून शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम होत आहे. यासंदर्भात आज मान.गटविकास अधिकारी कणकवली यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली च्या वतीने आकस्मिक भेट घेण्यात आली .

             ग्रामपंचायत स्तरावरून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा स्तरावर देखील शासन आदेशानुसार दिनांक 17 पर्यंत असे विविध कार्यक्रम होत आहेत आणि यामध्ये शिक्षकांचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे शिक्षकांना गावात झेंड्यांचे वाटप तसेच सर्वे करण्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध असून शिक्षक हे काम करणार नाहीत . गाव पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात शिक्षकांचे सहकार्य असणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती मधुन अशा प्रकारचे आदेश तेथील शिक्षकांना देण्यात आलेले आहेत, त्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाना समज देऊन त्यांनी दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात. अशा प्रकारची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अशा प्रकारची सक्ती होत असेल तर या दबावाला कोणीही बळी पडू नये. संघटना आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन सर्वांना करण्यात येत आहे.

          सदर भेटीचा सदर प्रसंगी तालुकाअध्यक्ष टोनी म्हापसेकर, शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, सरचिटणीस महेंद्र पवार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर , तालुका महिला आघाडी प्रमुख नेहा मोरे, कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, पतपेढी संचालक आनंद तांबे, प्रवक्ता विनायक जाधव, अंतर्गत हिशोब तपासणीस सुनील कदम, सल्लागार श्रीकृष्ण कांबळी, अजित कदम, निकिता बगळे, स्वाती चिंदरकर , विनोद ठाकूर आणि स्मिता मुसळे इत्यादी समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...