🛑 राज्यव्यापी सामुदायिक रजा आंदोलनाला कणकवलीत शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🔹महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने केलेले आंदोलन यशस्वी
▪️ कणकवली :
शासन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवीत आहे. शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. विविध उपक्रमांच्या लिंक भरणे , अभियाने राबवणे यांत वेळ मिळाला तर शिक्षक अध्यापन करु शकतात. हे सगळे करुन गुणवत्तेचा आग्रह धरायचा म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मानसिक तणाव आणणाऱ्या गोष्टी आहेत . जोपर्यंत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत शिक्षक समिती विविध टप्प्यात आंदोलन करतच राहणार अशा प्रकारचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी यावेळी केले.
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असतानाही शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी शासनाला जाग यावी म्हणून हा दिवस आंदोलनासाठी निवडण्यात आला. सकाळी साडे दहा वाजल्यापासून कणकवली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य गर्दी करु लागले होते. यामध्ये महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. समितीचे बहुसंख्य सदस्य रणरणत्या उन्हातही पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ऐकण्यात दंग होऊन गेले होते.
या आंदोलनाला कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर,महिला जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर , पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी , महिला तालुकाध्यक्ष नेहा मोरे , जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर , जिल्हा संघटक अजय तांबे , महिला सचिव विनिता शिरसाट , सहसचिव संतोष कांबळे , कार्याध्यक्ष प्रशांत दळवी , माजी जिल्हा कोषाध्यक्ष निलेश ठाकूर , उपाध्यक्ष धीरज हुंबे विभाग अध्यक्ष दिनेश जंगले , हेमंत राणे , विभागीय उपाध्यक्ष राजा कडुलकर , माजी सचिव सुशांत मर्गज , प्रसिध्दीप्रमुख प्रविण कुबल ,सल्लागार शिवाजी मडव, सुनिल गावकर ,संदीप गोसावी , किशोर गोसावी आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा