शनिवार, ६ मार्च, २०२१

कनेडी बाजारपेठ शाळेत कणकवली शिक्षक समिती कार्यकारिणी सभा उत्साहात संपन्न


🔴 आज दिनांक  ५ मार्च २०२१ रोजी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका कणकवली कार्यकारिणी सभा कनेडी बाजारपेठ शाळेत संपन्न झाली.


🟢 सभेमध्ये सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी सर्वांचे शाब्दिक स्वागत केले.


🌐 मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.


🟣 व्यासपीठावर सन्माननीय शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , कार्याध्यक्ष मणेरीकरसाहेब , शिक्षक बँक संचालक आनंद तांबे , केंद्रप्रमुख अडुळकर , महिलाध्यक्षा निकिता ठाकूर , महिला सरचिटणीस नेहा मोरे उपस्थित होते.


🟠 जिल्हा पदाधिकारी यांचेदेखील स्वागत करण्यात आले. 


🟢 कै. उमा महेश काणेकर स्मरणार्थ उपक्रमशील शिक्षिका पुरस्कारप्राप्त यांचेही गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. 


🟣 सचिव सुशांत मर्गज यांनी मागील सभेचे इतिवृत्त सविस्तर वाचून दाखवले. 


🟢 इतिवृत्तास सर्वांनी मंजुरी दिली.


🔴 तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी तालुका संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. नवांकुर या महिला सेलच्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा सभेत घडलेल्या माहितीचे सादरीकरण केले.  शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या विरोधात आपल्या समितीने जिल्हास्तरावर केलेल्या आंदोलनानंतरही आपली संघटना एकटी स्वतंत्रपणे देखील लढू शकते या गोष्टीचा पुनरुच्चार केला. वेळ आल्यास जिल्हा पातळीवरुन होणारे निर्णय आपणापर्यंत पोहोचवले जातील असेही सांगितले.


🟠 समितीचा NPS ला अजूनही विरोधच आहे. तसेच DCPS च्या त्रुटी पूर्ण करण्याबाबतही वारंवार संघटनात्मक पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.


🟢 वेतन निश्चिती व चट्टोपाध्याय वेतन संदर्भात शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस आणि श्रीकृष्ण कांबळी यांच्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.


🟣 मेडिकल बिले पेंडिंग नसल्याचेही त्यांनी सांगितले.


🌐 येत्या मंगळवारी २८ चटोपाध्याय धारक शिक्षकांचे विकल्प भरुन घेण्यात येतील असे सांगण्यात आले.


🟠 ज्या केंद्रांनी अद्याप संवर्धन निधी जमा केला नाही त्यांनी तो वेळीच जमा करण्याबाबत आवाहन करण्यात आले.


🟣 सर्व समितीचे शिलेदार समितीला नियमितपणे आर्थिक सहाय्य देतात याबद्दल तालुकाध्यक्ष यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.


🟢 यंदाची वार्षिक वर्गणी संवर्धन निधीमधून घेण्याचा ठराव घेण्यात आला.


🟠 गुणगौरव समारंभ २४ एप्रिल रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले.


🟢 दत्तक विद्यार्थी , NEP क्रमांकप्राप्त शिक्षक , संघटना प्रवेश केलेले शिक्षक , सेवानिवृत्त शिक्षक , विविध शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक , ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीधारक , नवोदय निवड झालेले दोन दिवसात अद्ययावत माहिती देणेबाबत आवाहन करण्यात आले.


🟠 महिला गीतगायन व खजिना कथांचा या उपक्रमातील सहभागींना प्रमाणपत्रे देणेबाबत ठरले.


🟣 कोषाध्यक्ष संतोष राणे यांच्या राजीनामा अर्जावर सविस्तर चर्चा झाली. पुढील सभेत त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीनंतरच त्यावर निर्णय देण्याचे ठरले.


🌐 संचालक आनंद तांबे यांनी शिक्षक बँकेबाबत सविस्तर आकडेवारी सांगितली. विविध योजना सांगितल्या.


🟢 सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी सर्वांचे आभार मानले. सभा ६.५७ वा. संपली. सभेला ५० पेक्षा जास्त शिक्षक सभासद उपस्थित होते.



©️ प्रवीण अशितोष कुबल , प्रसिद्धी प्रमुख








































शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

आधी डीसीपीएसधारकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच एनपीएसची कार्यवाही करा : गिल्बर्ट फर्नांडिस

आधी डीसीपीएसधारकांच्या शंकांचे निरसन करा आणि मगच एनपीएसची कार्यवाही करा : गिल्बर्ट फर्नांडिस

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण विभागाकडे आग्रहपूर्वक मागणी  


 कणकवली दिनांक : १२ फेब्रुवारी २०२१


          प्राथमिक शिक्षकांना पंधरा वर्षे लागू असलेली परिभाषित अंशदायी पेन्शन योजना म्हणजेच डिसीपीएसचे नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजेच एनपीएस मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. याची प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबतही दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे डीसीपीएसधारक प्राथमिक शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. या शिक्षकांच्या शंका निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावरुन त्याबाबतचे योग्य असे मार्गदर्शन करुनच पुढील कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी कणकवली तालुका शाखेच्या वतीने कणकवली गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. 

          डिसीपीएसधारक यांना सध्या नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेचे ( NPS ) खाते उघडण्यासाठीचा CSRF फॉर्म भरण्यासाठी आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे सामान्य DCPS धारक शिक्षक आपल्या भविष्यातील समस्यांनी ग्रस्त झाला आहे. निवृत्तीवेतनात अडचणी निर्माण झाल्यास आपले भवितव्यच अंधारमय होण्याची भितीही निर्माण झाली आहे. याकरिता तालुकास्तरावर याबाबत तज्ज्ञमार्गदर्शकांचे मार्गदर्शन आयोजित करुन मगच कार्यवाही सुरु करण्याची मागणीही समितीच्या वतीने करण्यात आली. 

          राष्ट्रीय पेन्शन योजना नक्की काय आहे ? DCPS धारकांना आजपर्यंतचा संपूर्ण हिशेब असलेले तपशीलवार विवरणपत्र , सेवानिवृत्तीनंतर कोणते लाभ मिळणार ? सेवेत असताना मृत्यू झाल्यास किती लाभ मिळणार ? DCPS धारकांना शासनाने द्यावयाचे अंशदान व व्याज याविषयीचे मुद्देसुद मार्गदर्शन इत्यादी सर्व बाबींचा निवेदनात उल्लेख केलेला असून त्यावर शासनस्तरावर योग्य असे मार्गदर्शन झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्याची घाई करण्यात येऊ नये अशीही स्पष्ट लेखी मागणी केली आहे. तसेच या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नसल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती याचा नेहमीच कडाडून विरोध करेल असेही मागणीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

          मागण्यांचे निवेदन कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याकडे देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष विनायक जाधव, महिलासेल अध्यक्षा निकिता ठाकूर, कार्याध्यक्षा नेहा मोरे , जिल्हा विभागिय अध्यक्ष महेंद्र पवार, श्रीकृष्ण ठाणेकर, संतोष राणे, सुनिल गांवकर, धीरज हुंबे, अजित कदम , सचिन सावंत,  संदिप तांबे, संदिप गोसावी, प्रिती मशिदकर , प्रवीण कुबल आणि सरचिटणीस सुशांत मर्गज उपस्थित होते.












मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

शिक्षक समितीची शाळांना प्रसंगानुरुप सदिच्छा भेट

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचे कणकवली तालुका शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिससर , कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसर, शिक्षक बँकेचे संचालक मा. आनंद तांबेसर, जिल्हा विभागिय पदाधिकारी मा. महेंद्र पवारसर, ज्येष्ठ सल्लागार मा. सत्यवान घाडीगांवकरसर, र्शेर्पे केंद्रसंघटक मा. आशिष दुधेसर , साळिस्ते केंद्रसंघटक मा. परदेशीसर , खारेपाटण केंद्रसंघटक मा. मंगेश मुद्रससर , शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक मा. सुनिल तांबेसर, उपशिक्षिका सीमा वरुणकरमॕडम , पदवीधर शिक्षक प्रवीण कुबलसर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिडवणे नं. १ शाळेच्या उपशिक्षिका मा. सुजाता प्रल्हाद कुडतरकरमॕडम यांचा मुलगा पराग ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल विशेष सदिच्छा भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. त्याबद्दल सर्व उपस्थित शिक्षक समिती शिलेदारांचे हार्दिक आभार.




















🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...