रविवार, १ ऑगस्ट, २०२१

शिक्षक समिती कणकवलीचा शैक्षणिक उपक्रम

 🔴 शिक्षक समिती कणकवलीचा शैक्षणिक उपक्रम

🟢 विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणुन उपलब्ध करुन दिल्या मोफत शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका


            कोविड १९ प्रादुर्भावामुळे  सन २०२०/२०२१ मधील रद्द झालेली शिष्यवृत्ती परीक्षा दि .९ ऑगस्ट रोजी होत आहे. गेल्या वर्षी या परीक्षार्थीं करीता तालुका शाखेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन केले होते मात्र लॉकडाऊन जाहीर झाले व परीक्षा रद्द करावी लागली.

         शिक्षक समितीच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून परीक्षा प्रश्न पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. शासनाच्या वतिने दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी अंतिम परीक्षा घेण्यात असल्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेपूर्वी  शिष्यवृत्ती सराव पेपर मुलांना  सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कणकवली  तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सर्व शाळांमधील इ. ५ वी तील विद्यार्थ्यांना सदर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शाळा स्तरावर किंवा घरी पालकांच्या समक्ष मुलांकडून सरावासाठी सोडवून घेण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका सोडविल्याने मुलांना पूर्व परीक्षेचा सराव व स्वतःच्या अध्ययनाचा अंदाज घेण्यात निश्चितच मदत होईल. विद्यार्थ्यांनी सोडविलेली प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तपासून त्यांना मार्गदर्शन करावे.

             सदर मोफत शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी आज शनिवार दि. ३१ जुलै २०२१ रोजी सायं. ४.३० वा. शाळा कलमठ बाजारपेठ येथे प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आले. सदर उपक्रमासाठी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुका अध्यक्ष विनायक जाधव, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे, प्रश्न पत्रिका निर्मिती प्रमुख वल्लभानंद प्रभु, मंगेश लाड, सदानंद गावकर, दिलीप कदम त्याचप्रमाणे जिल्हा, तालुका कार्यकारीणी पदाधिकारी, सभासद यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी परीक्षार्थ्यींना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️

          तालुकाध्यक्ष

 श्री. विनायक जाधव


     तालुका सरचिटणीस

   श्री. सुशांत मर्गज

♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️

शनिवार, ३१ जुलै, २०२१

गायक स्वर : मा. सारिका देवू पवार ,वर्ग : इयत्ता : तिसरी : मराठी 🟢 कवितेचे नाव : हिक्के होक्के मरांगे मरांग


🟠 गायक स्वर : मा. सारिका देवू पवार

🟣 वर्ग : इयत्ता : तिसरी : मराठी

🟢 कवितेचे नाव : हिक्के होक्के मरांगे मरांग

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प ९ वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा. 

🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻

सेवानिवृत्तीपर शुभेच्छा

 🟢 सेवानिवृत्तीपर शुभेच्छा🟢

****************************

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीचे ज्येष्ठ सदस्य,

 जि .प .शाळा दिगवळे करंबळी येथील शिक्षक

सन्मा. श्री. संतोष ( नाना ) वसंत मुसळे सर

हे नियत वयोमानाने आज सेवानिवृत्त होत आहेत . त्यांना शिक्षक समिती परिवाराकडून सेवानिवृत्तीपर खूप खूप शुभेच्छा !!!!!!

त्यांना पुढील आयुष्य सुखी , दिर्घायुषी ,निरोगी , लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

💐💐💐💐💐💐💐💐💐




शैक्षणिक साहित्य वितरण : शाळा हरकुळ खुर्द भटवाडी

कार्यक्रमस्थळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . सुधीर रासम , मुख्याध्यापक श्री . अभय वालावलकर सर . उपशिक्षक श्री . राजेंद्र जाधव सर   श्री . श्रीकृष्ण कांबळी सर  श्री .संदीप गोसावी सर , ग्रामस्थ सचिन रासम , श्री . गणेश रासम आदी उपस्थित होते . 

 


🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...