🔴 शिक्षक समिती कणकवलीचा शैक्षणिक उपक्रम
🟢 विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा म्हणुन उपलब्ध करुन दिल्या मोफत शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका
कोविड १९ प्रादुर्भावामुळे सन २०२०/२०२१ मधील रद्द झालेली शिष्यवृत्ती परीक्षा दि .९ ऑगस्ट रोजी होत आहे. गेल्या वर्षी या परीक्षार्थीं करीता तालुका शाखेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन केले होते मात्र लॉकडाऊन जाहीर झाले व परीक्षा रद्द करावी लागली.
शिक्षक समितीच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून परीक्षा प्रश्न पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. शासनाच्या वतिने दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी अंतिम परीक्षा घेण्यात असल्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेपूर्वी शिष्यवृत्ती सराव पेपर मुलांना सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कणकवली तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सर्व शाळांमधील इ. ५ वी तील विद्यार्थ्यांना सदर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. शाळा स्तरावर किंवा घरी पालकांच्या समक्ष मुलांकडून सरावासाठी सोडवून घेण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका सोडविल्याने मुलांना पूर्व परीक्षेचा सराव व स्वतःच्या अध्ययनाचा अंदाज घेण्यात निश्चितच मदत होईल. विद्यार्थ्यांनी सोडविलेली प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तपासून त्यांना मार्गदर्शन करावे.
सदर मोफत शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी आज शनिवार दि. ३१ जुलै २०२१ रोजी सायं. ४.३० वा. शाळा कलमठ बाजारपेठ येथे प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आले. सदर उपक्रमासाठी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुका अध्यक्ष विनायक जाधव, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे, प्रश्न पत्रिका निर्मिती प्रमुख वल्लभानंद प्रभु, मंगेश लाड, सदानंद गावकर, दिलीप कदम त्याचप्रमाणे जिल्हा, तालुका कार्यकारीणी पदाधिकारी, सभासद यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी परीक्षार्थ्यींना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️
तालुकाध्यक्ष
श्री. विनायक जाधव
तालुका सरचिटणीस
श्री. सुशांत मर्गज
♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️🔮♦️