रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२
🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन
कणकवली :
रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने निकिता ठाकूर( तालुकाध्यक्षा , महिला सेल ) यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक 10 ते दुपारनंतर 4 पर्यंत मराठा मंडळ सभागृह , कणकवली येथे महिला मेळावा 2022 संपन्न होणार आहे. तरी सर्व महिला शिक्षकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव आणि तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
त्यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य महिला अध्यक्षा वर्षाताई केनवडे असणार आहेत. तसेच प्रमुख मार्गदर्शिका पियुषा प्रभुतेंडोलकर , शिक्षक नेते भाई चव्हाण , राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , जिल्हाध्यक्ष नितीन कदम , शिक्षक नेते नंदकुमार राणे , प्रवक्ते सुनिल चव्हाण , जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , राज्य महिला सल्लागार सुरेखाताई कदम , प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष नामदेव जांभवडेकर , बँकेचे उपाध्यक्षा नीलम बांदेकर , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे , शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी.कदम , राज्य विभागीय उपाध्यक्ष शरद नारकर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित राहणार आहेत.
पियुषा प्रभुतेंडुलकर यांचे ' कार्यप्रेरणा आणि ताणतणाव सामना या विषयावर कृतीयुक्त मार्गदर्शन होणार आहे. स्नेहभोजन , फनिगेम्स आणि महिला समिती रत्न 2022 इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला मेळावा 2022
प्रति ,
मा. सर्व प्राथमिक शिक्षक समिती पाईक
यांसी ,
🛑 कृपया महिला मेळाव्याला उपस्थित रहा 🙏🏻🙏🏻🙏🏻
रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडीच्या वतीने मा. निकिता ठाकूरमॅडम ( तालुकाध्यक्षा , महिला सेल ) यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक 10 वाजता मराठा मंडळ सभागृह , कणकवली येथे महिला मेळावा 2022 संपन्न होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
🛑 होणारे कार्यक्रम
1️⃣ उदघाटन व स्वागत
2️⃣ संघटनात्मक मार्गदर्शन
3️⃣ मा. पियुषा प्रभुतेंडुलकर यांचे ' कार्यप्रेरणा आणि ताणतणाव सामना कृतीयुक्त मार्गदर्शन
4️⃣ स्नेहभोजन
5️⃣ फनिगेम्स
6️⃣ महिला समिती रत्न 2022
©️ आपले नम्र
🟢 मा. गिल्बर्ट फर्नांडिस , शिक्षक नेते
🟡 मा. विनायक जाधव , तालुकाध्यक्ष
🟠 मा. सुशांत मर्गज , तालुका सरचिटणीस
🟢 मा. नेहा मोरे , महिला तालुका सरचिटणीस
🟡 सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली व महिला आघाडी कणकवली
🛑 प्रसिद्धी प्रमुख
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२
🛑 कणकवली तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मा. मिलिंद मेस्त्री यांचे अभिनंदन
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली तालुका यांच्या वतीने उपसभापती यांचे अभिनंदन करण्यात आले.
🟠 नुकतीच मा. मिलिंद मेस्त्री यांची कणकवली तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड झाली आहे.
🟡 मा. मिलिंद मेस्त्री ( नूतन उपसभापती , पंचायत समिती , कणकवली ) यांचे कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी संघटनेचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , उपाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर , तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज , प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मा. आनंद तांबे , जिल्हा कार्यालयीन चिटणीस मा. संतोष कुडाळकर , तालुका पदाधिकारी मा. मणेरीकरसाहेब आणि समितीचे तालुका शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते.
🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा : कणकवली तालुका यांच्या वतीने माहितीस्तव जारी.
गुरुवार, २७ जानेवारी, २०२२
🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने केले झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पसची महाविजेती गौरी गोसावीचे अभिनंदन
🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने केले झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पसची महाविजेती गौरी गोसावीचे अभिनंदन
🟢 कुडाळ तालुक्यातील पडवे गावची 12 वर्षीय सिंधुदुर्गकन्या गौरी गोसावी हीने आपल्या सुरेल स्वरांनी आणि बहारदार सादरीकरणाने महाअंतिम फेरीत इतर स्पर्धकांवर मात करत महाराष्ट्राची महागायिका म्हणून या स्पर्धेचे महाविजेते पद पटकावले होते.
🛑 सध्या चारकोप-मुंबई येथे वास्तव्यास असलेली आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल, बोरीवली (प) या शाळेची विद्यार्थिनी असलेल्या गौरीने सुरुवातीपासूनच एकापेक्षा एक सरस गाणी सादर करत परीक्षकांसह रसिकांची मने जिंकत तब्बल 14 वेळा वरचा ‘सा’ मिळवत 14 गोल्डन तिकिटे मिळवली आणि दिमाखात महाअंतिम फेरीत दाखल झाली.अंतिम विजेतेपद मिळवत महाराष्ट्राची महागायिकाही बनली.
🛑 आज 27 जानेवारी 22 रोजी मा. संदिप गोसावीसर यांच्या घरी या महागायिकेचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
🛑 त्यावेळी शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव , तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गजसर आणि संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.
©️ प्रसिध्दीप्रमुख
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...


