गुरुवार, ३ मार्च, २०२२

🛑 शिक्षक समितीचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी हिताचे : उपसभापती मिलिंद मेस्त्री

🛑 जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न

🔵 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , जिल्हा सिंधुदुर्गचा शैक्षणिक उपक्रम

🟤 कणकवली तालुक्यातील कणकवली नं.५ या शाळेत तालुकास्तरीय उदघाटन

🟡 कणकवली :

          इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांचा अधिक सराव होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी ३ मार्च २२ रोजी राबवण्यात आला. 

          कणकवली तालुक्यातील सर्व २२ केंद्रात शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या मुलांची परीक्षा घेण्यात आली. तालुकास्तरीय उदघाटन सोहळा कणकवली नं.५ शाळेत समारंभपूर्वक संपन्न झाला. 

          कणकवली तालुका पंचायत समितीचे उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. त्यावेळी कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक सभेचे जिल्हाध्यक्ष विजय भोगले , कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव किशोर कदम , कणकवली तालुका केंद्रप्रमुख संघटना अध्यक्ष विजय मसुरकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अच्युत देसाई , उज्ज्वला जावडेकर , तालुका सल्लागार शिवाजी मडव , मुख्याध्यापिका कल्पना मलये , हर्षकला लोके , जिल्हा संघटक अजय तांबे , केंद्रसंघटक प्रमोद पवार , तालुका महिला सेल अध्यक्षा निकिता ठाकूर , महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे आणि शिक्षक समिती शिलेदार उपस्थित होते. 

          त्यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कणकवली तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी मानले. तालुक्यातील सर्व केंद्रसंचालक , पर्यवेक्षीय सदस्य आणि समिती शिलेदार यांनी केलेल्या मेहनतीबद्दल तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत. कणकवली तालुका पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनीही फोन संदेशद्वारे समितीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 



























































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...