बुधवार, २७ जानेवारी, २०२१

नुतन सरचिटणीस मा. श्रीमती नेहा मोरे यांचे अभिनंदन करताना समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितिन कदमसर व कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसर

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या महिला आघाडीच्या नुतन सरचिटणीस मा. श्रीमती नेहा मोरे यांचे अभिनंदन करताना समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितिन कदमसर व कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसर



अभिनंदन व शुभेच्छा मा. निकिता ठाकूर यांचे

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुका शाखेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून मा. सौ. निकिता निलेश ठाकूरमॕडम यांची अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदमसाहेब , कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसाहेब आणि मा. निलेश ठाकूरसर



शनिवार, २३ जानेवारी, २०२१

कणकवली प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी नवीन कार्यकारिणी गठित

कणकवली प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी नवीन कार्यकारिणी गठित


कणकवली दिनांक :  २३ जानेवारी २०२१


          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवली तालुका कार्यकारिणीची सभा शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांच्या अध्यक्षतेखाली शाळा कलमठ बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी व्यासपीठावर उपस्थित शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, महिला सेल अध्यक्षा वृषाली सावंत, महिला सेल सचिव रश्मी आंगणे, जिल्हा विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार, शिक्षक पतपेढी माजी उपाध्यक्ष तथा संचालक आनंद तांबे आदी मान्यवरांचे शाखेच्यावतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.  त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला तालुका कार्यकारिणी सदस्य, सर्व शिक्षक समिती शिलेदारांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.

          प्रास्ताविक शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांनी व्यक्त केले. यामध्ये नविन कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात नियमावली स्पष्ट केली. मागील कार्यकारिणीच्या कार्याचे कौतुक केले. संघटनेच्या विविध उपक्रमांचा व संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. यानंतर महिलाध्यक्षा वृषाली सावंत व सरचिटणीस रश्मी आंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          नवीन कार्यकारिणी गठीत करणेबाबत चर्चा करण्यात आली. व सूचक अनुमोदक या प्रमाणे सन २०२१ ते २०२४ या कालावधी करीता अध्यक्षा म्हणून निकिता ठाकूर तर सरचिटणीसपदी नेहा मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्षा सुप्रिया म्हसकर, कार्यालयीन चिटणीस पूजा शंकरदास, कोषाध्यक्षा ऋतुजा जंगले, कणकवली उपाध्यक्षा विशाखा काणेकर, कनेडी उपाध्यक्षा स्नेहा गोठणकर, फोंडा उपाध्यक्षा दर्शना हुंबे, हुमरट उपाध्यक्षा ममता सावंत, तळेरे उपाध्यक्षा आरती कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच तालुका संपर्क प्रमुख संजना चिंदरकर, सल्लागार कल्पना मलये, वृषाली सावंत, प्रणाली निकम, स्वप्नाली रावराणे, स्वराशा कासले यांना निवडण्यात आले. 

          केंद्र संघटक म्हणून कणकवली- प्राजक्ता सावंत,जानवली - संगीता सावंत, वागदे- अपूर्वा सावंत, सावडाव- स्नेहा सामंत, हळवल- श्रेया ठाणेकर, घोणसरी - श्रेया नानचे, भिरवंडे - निकिता बगळे, नरडवे -  सोनाली कदम, पियाळी - अनुराधा कदम, साळिस्ते - साधना लोकरे, डामरे- तिवरे - अपेक्षा कदम, बिडवाडी -  सारिका पवार यांची निवड करण्यात आली. 

          बोर्डवे, कळसुली, हरकुळ बुद्रुक, हरकुळ खुर्द, फोंडा, नाटळ, कासार्डे, खारेपाटण, शेर्पे, नांदगाव, इ. केंद्रांच्या केंद्रसंघटकांची निवड मागावून करण्यात येणार आहे.

          शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस, विभागीय अध्यक्ष महेंद्र पवार, महिला अध्यक्षा वृषाली सावंत, महिला सरचिटणीस रश्मी आंगणे, संचालक आनंद तांबे, तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी मनोगत व्यक्त केले. महिला सरचिटणीस रश्मी आंगणे यांनी सर्वांचे तालुका शाखेच्या वतीने आभार व्यक्त केले.




शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षांच्या दौर्‍यात शिक्षक समिती मध्ये विदर्भातील शेकडो शिक्षकांचा समितीत प्रवेश

 शिक्षक समितीच्या राज्याध्यक्षांच्या दौर्‍यात  शिक्षक समिती मध्ये विदर्भातील शेकडो शिक्षकांचा समितीत प्रवेश


अमरावती-२२/१/२०२०


          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महाराष्ट्रात ३५ जिल्ह्यात शाखा आहे.शिक्षक समिती सतत विद्यार्थी, समाज,शिक्षक यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून शासनास सोडविण्यास भाग पाडते.संघटन अधिक मजबुत व्हावे म्हणुन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर,राज्य सरचिटणीय विजय कोंबे, राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, अमरावती विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्नर नाकाडे, नागपूर विभागीय अध्यक्ष अशोक वैद्द यांनी १७ जानेवारी ते २०जानेवारी पर्यंत विदर्भातील वाशिम,यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,भंडारा,नागपूर येथे संपर्क सभा,संवाद सभा घेतल्या या सभेत विदर्भात जिल्हातील शिक्षक, शिक्षिका यांनी समितीत प्रवेश केला.

          वाशिम जिल्हातील जिल्हाध्यक्ष विनोद घुगे,सतिश सांगळे यांच्या उपस्थित शिक्षकांनी प्रवेश केला,यवतमाळ येथे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे,सरचिटणीस गजानन देऊळकर,संदिप मोहाडे यांच्या पर्यंतनाने पुसत पं.स.मधिल सुभाष डवले,बबन पाईकराव, संतोष मारकड,गजानन मोडक,अशोक ताळीकोटे, सुरेश काळे,प्रभाकर बार्‍हाळे,कैलास वारकड, अंकुश देवकत्ते,संजय डांगे,गजानन खुडे, अविनाश आडे,सचिन हातमोडे,पांढरकवडा पं.स.मधिल उपक्रमशिल शिक्षक प्रशांत येडशीकर, भगवान शिवरकर,राजेश पेन्दोर,रविद्र आगीरकर, कावडे,घाटंजी पं.स. मधिल संदिप गेडाम, रामकृष्ण सुरपाम,सचिन मांडवगोडे,ओमप्रकाश भवरे,संदिप पडगीलवार, संजय पोहणकर,देवजी मेश्राम,अनंता मडावी, देवानंद भाटे,लिना लढे, सी.पी.झाडे,कृणाल गेडाम,महादेव घोडाम, हिरा धुर्वे,निरंजन मांडवे, महेंद्र पाटिल,सिमा गावंडे,शिक्षक संघाचे माजी सचिव रामलाल जाधव, महागाव पं.स.मधिल आदर्श व उपक्रशील शिक्षिका अर्चना भरकाडे, प्रदिप गावंडे,गजानन काळे,महेश बोराडे, शुभांगी जाधव,कृणाल भगत,निलेश रावेकर, विनोद बोडखे,मंगेश बावणे,सुनिल राठोड, महेंद्र येटे यांनी शिक्षक समितीत जाहीर प्रवेश केला.वर्धा मधिल नरेंद्र  गाडेकर,मनिष ठाकरे, रामदास खेराळे यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी प्रवेश केला.

          गोंदिया जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित,एल.यु.खोब्रागडे,किशोर डोंगरवार,भंडारा ईश्वर नाकाडे,मोहन पडोळे,रामभाऊ कोरे, हरकीसन अंबादे,नागपूर जिल्हाध्यक्ष लिलाधर ठाकरे,सौ.मिनल देवरनकर,अनिल नासरे यांच्या प्रयत्नाने इतर संघटनेचे विलास चालखोर,मधुसुदन चरपे,विजय वांढरे,सुरेंद्र आगरकर,वि.सोमकुवर यांनी प्रवेश केला. सर्व मान्यवरांचा राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिक्षक समितीचा शेला देऊन सत्कार केला.

          प्रवेश घेतलेल्या शिक्षकांचा शिक्षक समितीत सन्मानजनक वागणुक देण्यात येईल असे उद्गार राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी काढले.त्यांच्या दौऱ्याने विदर्भात नवचैतन्य निर्माण झाले आहे असे उद्गार  राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी व्यक्त केले.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.






बुधवार, २० जानेवारी, २०२१

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे नूतन अध्यक्ष मा. नामदेवराव जांभवडेकरसाहेब यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिससर, कणकवली तालुका शाखा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मा. विनायक जाधवसर , पदाधिकारी मा. आनंद तांबेसर, मा. श्रीकृष्ण कांबळीसर, मा. महेंद्र पवारसर, मा. संतोष राणेसर आणि इतर

 सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे नूतन अध्यक्ष मा. नामदेवराव जांभवडेकरसाहेब यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिससर, कणकवली तालुका शाखा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मा. विनायक जाधवसर , पदाधिकारी मा. आनंद तांबेसर, मा. श्रीकृष्ण कांबळीसर, मा. महेंद्र पवारसर, मा. संतोष राणेसर आणि इतर


कासार्डे केंद्र : संवर्धन निधी संकलन सन २०२० - २१


 

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

५००० रुपयाची रोख स्वरुपात मदत करण्यात आली तनिष्काला

 नमस्कार,

     आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरकूळ खुर्द गावडेवाडी शाळेची विद्यार्थीनी कु.तनिष्का तुकाराम परब इयत्ता चौथी ही विद्यार्थीनी चालताना पडली;आणि  उजव्या हाताची दोन्ही हाडे तुटली.त्यामुळे खाजगी रुग्णालयात आँपरेशन करावे लागले.घरची आर्थिक  परिस्थिती बिकट असल्यामुळे फार मोठे संकट कुटूंबावर ओढवले होते.या सर्व घटनेची माहिती सन्मा.तालुका अध्यक्ष श्री.विनायक जाधव सर यांना दिली.सरांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.सरांना संघटनेच्या वतीने शक्य असल्यास आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.आमच्या आवाहनाची सत्यता पडताळून हरकूळ खुर्द गावी विद्यार्थीनीच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या संघटनेच्या वतीने *तालुका सल्लागार सन्मा.श्री.अनिल सावंत यांचे हस्ते ५००० रुपयाची रोख स्वरुपात मदत करण्यात आली* .त्याचा कुटूंबाला फार मोठा आर्थिक आधार मिळाला.यावेळी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस सर, ५००० रुपयाची रोख स्वरुपात मदत करण्यात आ तालुका अध्यक्ष श्री.विनायक जाधव सर ,जिल्हा विभागीय अध्यक्ष श्री.महेंद्र पवार,जिल्हा संघटक श्री.दिलिप शेळके,कार्याध्यक्ष श्री.संतोष तांबे,श्री.राजेंद्रप्रसाद मणेरीकर,कार्यालयीन सचिव महेश चव्हाण,उपाध्यक्ष श्री.विजय पाताडे,माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण कांबळी,जेष्ठ सदस्य श्री.धिरज हुंबे,श्री.सदाशिव राणे,श्री.अभय वालावलकर,श्री.उत्तम सातवसे,श्री.श्रीकांत बुचडे आदि समितीचे सदस्य उपस्थित होते.या संघटनेच्या उपक्रमाचे हरकूळ खूर्द गावातील पालक,ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.आम्ही शाळेच्या वतीने,परब कुटूंबाच्या वतीने संघटनेचे आभार व्यक्त करतो.


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 

        

       श्री.जगन्नाथ घाडीगांवकर 

      केंद्रसंघटक हरकूळ खुर्द


           श्री.राजाराम  भिसे                             विभागीय अध्यक्ष प्रभाग फोंडाघाट

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...