शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

राज्यव्यापी धरणे आंदोलन : चलो सिंधुदुर्ग नगरी : शिक्षक समिती अपडेट

 🤝🏻🤝🏻 चलो सिंधुदुर्गनगरी 🤝🏻🤝🏻

🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️ चलो सिंधुदुर्गनगरी 🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️                              

राज्य व्यापी धरणे आंदोलन

 🎯  महाराष्ट्र राज्य  प्राथमिक शिक्षक समिती 🎯

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू, भगिनींना येते की सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी राज्य शाखेच्या आदेशानुसार शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन सकाळी 11 ते दु 3 या वेळात आयोजित करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या

1.स्थानिक स्वराज्य संस्था मधील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व विद्याथ्यांना गणवेश देण्यात यावा.

2. मागासवर्गीय आणि BPL खालील मुलींना एक रुपये ऐवजी  25 रु उपस्थिती भता लागू करावा.

3. शिक्षण सेवक यांचे मानधन 6000 रुपये वरून 25 हजार रु करणे.

4.सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांच्या बाबतल्या त्रुटी दूर कराव्यात

5. वस्तीशाळा शिक्षकांची  सुरुवातीची नियुक्ती तारीख सर्व लाभासाठी धरण्यात यावी.

6.डीसीपीएस शिक्षकांच्या पगारातून कापून गेलेल्या रकमाचा हिशोब घोळ पूर्ण करावा.

7. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी*.

8.13 ऑक्टो.2016 चे परिपत्रक रद्द करून सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी.

9. जुन 2014 ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा शिक्षकामधूनच भरण्यात यावीत.

10. ग्रामीण भागात मुख्यालयी राहण्याचे 9 सप्टेंबर 2019 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे.

11. आंतरजिल्हा बदली मधील जाचक अटी रद्द करून आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी.

12. दरमहा उशिरा होणारे पगार वेतन 1 तारखेस करण्यात यावा.  

तरी वरील सर्व प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सोडविण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी  उपस्थित राहावे.

स्थळ - मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्गनगरी

वेळ - सकाळी 11ते दुपारी 3

🤝🏻  आपले नम्र 🤝🏻

🌀 राज्य पदाधिकारी🌀

मा. राजन कोरगावकर - राज्य उपाध्यक्ष 

मा. नामदेव जांभवडेकर -राज्यसहसचिव 

मा. शरद नारकर -राज्य कोकण विभागीय उपाध्यक्ष 

मा दिलीप कदम - राज्यसंघटक 

मा सुरेखा कदम - राज्य महिला आघाडी सल्लागार 

🌀  प्रेरणास्थान🌀

मा भाई चव्हाण - ज्येष्ठ मार्गदर्शक

मा चंद्रकांत अणावकर - ज्येष्ठ मार्गदर्शक

🌀 जिल्हा कार्यकारणी🌀

मा. नितीन कदम -जिल्हाध्यक्ष

मा. सचिन मदने - जिल्हासरचिटणीस

मा. नंदकुमार राणे- शिक्षक नेते

मा.  चंद्रसेन पाताडे -उपाध्यक्ष 

मा लवू चव्हाण-  उपाध्यक्ष 

मा. नारायण नाईक - कार्याध्यक्ष 

मा लहू दहिफळे - कोषाध्यक्ष 

मा सुनिल चव्हाण - प्रवक्ता 

मा. प्रशांत मडगावकर -संपर्क प्रमुख 

मा सुधीर गोसावी - संपर्क प्रमुख

मा. कलीम पटेल -संघटक 

मा.उदय शिरोडकर -उपाध्यक्ष 

मा तुषार आरोसकर - उपाध्यक्ष 

मा.प्रकाश झाडे-उपाध्यक्ष 

मा सुहास रावराणे- उपाध्यक्ष 

मा संतोष कुडाळकर - कार्यालयीनचिटणीस

मा आपा सावंत - कार्यालयीनचिटणीस 

मा. गजानन नावकार -उपाध्यक्ष 

मा प्रफुल्ल जाधव -प्रसिध्दी प्रमुख 

मा रावजी परब - सल्लागार 

मा संजय पाताडे - सल्लागार 

मा सदानंद मोरे - सल्लागार 

मा सुगंध तांबे - सल्लागार 

मा जयसिंग गावीत -सल्लागार 

मा दिलीप प्रभुखानोलकर - सल्लागार 

मा गिल्बर्ट फर्नांडिस - सल्लागार

सर्व जिल्हाकार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य

तसेच 

सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, तालुका  कार्यकारणी पदाधिकारी  सिंधुदुर्ग जिल्हा

⛳✊🏻समस्त शिक्षक समिती परिवार सिंधुदुर्ग ✊🏻⛳

🔹🔸🔹🔸🔹🔸

✊🏻गोरगरीब विद्यार्थ्याच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक समितीचा लढा✊🏻

  🔥🤝🏻🔥🤝🏻  जय शिक्षक समिती🔥🤝🏻🔥🤝🏻




मा. जयंत पाटीलसाहेब यांची भेट ( शिक्षक समिती अपडेट )

दि. 30/10/2021 वार शनिवार रोजी मा. जयंत पाटील साहेब यांची भेट लेमनग्रास हॉटेल, कुडाळ येथे घेऊन त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटीबाबत पुन्हा एकदा माहिती थ देण्यातआली.
त्यावेळी त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासनाने बक्षी समितीच्या शिफारशी स्विकारून सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे. तो लागू करताना सहाव्या वेतन आयोगातील वेतनबँड व ग्रेडपे बंद करत पे मॅट्रिक्स पद्धती आणली आहे. यामुळे २ जानेवारी २००४ नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या ज्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ नंतर लागू होते अशांच्या वेतनात ३५९८ रुपयांच्या वर फरक पडत आहे. समान पदांवर एक दिवसाच्या फरकाने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या वेतनात पडणाऱ्या तीन वेतनवाढीच्या फरकाच्या अन्याया विरोधात काल दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी मा. नामदार जयंतजी पाटील साहेब, यांची लेमनग्रास हॉटेल, कुडाळ येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनत्रुटीमुळे तयार झालेली तफावत व पदवीधर शिक्षकांच्या वेतनातील तूट यासंदर्भात राज्य स्तरापर्यंत अभ्यासपूर्ण लढा उभारलेले तालुका कार्यकारिणी तालुका संपर्क प्रमुख संतोष वारंग , तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष, दादा जांभवडेकर राज्य सहसचिव, उदय शिरोडकर जिल्हा उपाध्यक्ष, महेश कुंभार सरचिटणीस, संगिता राऊळ महिला आघाडी अध्यक्ष, भार्गवी कापडी सरचिटणीस, मनीषा मेस्त्री, बापू ठाकूर, शिल्पा साटम, प्रकाश रावले, गजानन चीपकर, आप्पा सावंत एकनाथ सावंत संतोष तेरसे, प्रदिप नेरूरकर उपस्थित होते.
             सेवा कालावधीत पदोन्नतीच्या संधी कमी असल्याने होणारी कुंठीतता घालविण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नेमलेल्या चटोपाध्याय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शिक्षकांना १२ वर्षानंतर वरिष्ठ श्रेणी दिली जाते तर २४ वर्षानंतर निवड श्रेणी दिली जाते. यानुसार ६ व्या वेतन आयोगामध्ये वेतनबैंड ९३००- ३४८०० व ग्रेडपे ४२०० नुसार १४०० रुपयांची वाढ वरिष्ठ वेतनश्रेणी मिळताना मिळत होती. जी वार्षिक वेतनवाढीच्या तिप्पट होती. सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू केला आहे. ६ व्या वेतन आयोगाचे बेसिक ७ व्या वेतन आयोगात रुपांतरीत करताना २.५७ हा फॉर्म्युला वापरला गेला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०१६ पूर्वी ज्या शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण होवून वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली आहे, त्यांच्या वेतन ग्रेड पेतील फरक १४०० गुणिले २.५७ म्हणजेच ३५९८ रुपयांची वाढ मिळाली, रास्तच व चटोपाध्याय शिफारशीला अनुरूप आहे.
             परंतु १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त व १ जानेवारी २०१६ नंतर १२ वर्षे पूर्ण होवून वरिष्ठ वेतनश्रेणीला पात्र शिक्षकांवर ७ व्या वेतन आयोगाच्या पेमॅट्रिक्स प्रणाली मुळे खूप मोठा अन्याय झाला आहे. त्यामध्ये वेतनबँड ५२००-२०८०० व २८०० ग्रेडपे ला एस १० हा तर ९३००-३४८००, ग्रेडपे ४२०० ला एस-१३ स्तर निश्चित केला आहे. म्हणजेच १२ वर्ष सेवा कालावधीनंतर शिक्षकांचे वेतन एस-१० मधून एस-१३ मध्ये निश्चित केले जात आहे. असे करताना मूळ वेतनात ज्येष्ठ शिक्षकांप्रमाणे ३५९८ अपेक्षित असताना ती केवळ ७०० रुपये होत आहे. ही वाढ अतिशय तोकडी अपेक्षा पेक्षा पाचपट कमी, वार्षिक वेतन वाढीच्या निम्मी, अनैसर्गिक, अन्यायी व चटोपाध्याय आयोगाला डावलणारी आहे. 
               सातव्या वेतन आयोगात दरमहा नुकसानीचा फटका बसणारे शिक्षक हे आधीच जुन्या पेन्शनला मुकले आहेत. तसेच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ही एकमेव वेतनातील वाढ आहे जी सेवेत एकदाच तीही एकाच पदावर एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे राहिल्यावर मिळते. निवडश्रेणी २४ वर्षानंतर मिळत असली तरी ती लाभार्थ्यांपैकी फक्त २०% शिक्षकांनाच मिळत असल्याने, कित्येक शिक्षक ती घेण्याआधी मयतही झालेले आहेत. तरी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी मध्ये बदल करून ती सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणारी दोन वेतनवाढींची तूट भरून काढेल अशी रचना करण्यास विनंती आहे.
              त्याचबरोबर सहाय्यक शिक्षकांपेक्षा जादाची कर्तव्ये पदवीधर शिक्षकाला निर्धारीत केलेली आहेत. त्यानुसार पदवीधर शिक्षकाचा ग्रेड पेही सहाव्या वेतन आयोगात 4300 जो सहाय्यक शिक्षकाचा 4200 होता. तरीही प्रत्यक्ष सातव्या वेतन आयोगात वेतन पुर्नरचना करताना पदवीधर वेतनश्रेणी स्विकारलेल्या पदवीधर शिक्षकाच्या व समान तारखेला नियुक्ती दिलेल्या सहाय्यक शिक्षकाच्या मूळवेतनात 100 रूपयाची तफावत ही अनाकलनीय आहे. 
          मान. नामदार जयंतजी पाटील साहेब यांना आजच्या निवेदनात आमच्यावरील हा अन्याय दूर करण्यासाठी खंड २ मध्येच याबाबत योग्य ती तरतूद करण्यासाठी शासनाला माहिती करून द्यावी व आम्हाला त्याव्दारे न्याय मिळवून दयावा अशी विनंती करण्यात आली.


कणकवली तालुका शिक्षक समितीची कार्यकारिणी सभा संपन्न झाली.

 







शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

मुलांनो , प्राथमिक शिक्षक समिती तुमच्यासोबत आहे : तालुकाध्यक्ष विनायक जाधव

कोविड 19 मुळे निधन पावलेल्या पालकांच्या १६ मुलांना आर्थिक मदतीचा हात 

मुलांनो , प्राथमिक शिक्षक समिती तुमच्यासोबत आहे  : तालुकाध्यक्ष विनायक जाधव 

कणकवली : दिनांक : २९ ऑक्टोबर २०२१  :  ( प्रवीण कुबल )

            कोरोनाने अनेकांच्या घरात मृत्यूने थैमान मांडलेले असताना त्याचा फटका शाळेतील मुलांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु शिक्षक समितीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदतीचा हात देत ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' असा दिलेला दिलासा म्हणजे एक मानसिक आधारच ठरणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. 

            आतापर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असताना कणकवली शाखेने  शाळा बंद , शिक्षण सुरु च्या काळातही कलांकुर , स्वातंत्र्यदिन गीतगायन पंधरवडा , खजिना कथांचा , रक्तदान , विद्यार्थी दत्तक पालक योजना , खेळताना अपघात झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक पाच हजार रुपये निधी , मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन करणारा गाऊ आनंदे उपक्रम , जिल्हा शाखेच्या वतीने 45 लाखांचा निधी उभारून ऑक्सिजन प्लांट असे उपक्रम राबवले आहेत. पालकांचे , विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हित लक्षात घेऊन राबवलेले हे उपक्रम स्तुत्य असल्याबाबत अनेक मान्यवरांनी समितीबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. 

            यावर्षी कोविड मुळे निधन झालेल्या पालकांच्या १६ मुलांना कणकवली तालुका शाखा शिक्षक समितीच्या माध्यमातून रोख दोन हजार रुपयांची भरीव अशी तातडीची आर्थिक मदत करण्यात आली. त्यामध्ये युवराज योगेश गावकर ( ओटव नं.१ ),  अथर्व महेश राणे ( बिडवाडी कणखरे ) , सिद्दिक सोनू शेळके ( तळेरे नं. १ ) , किमया सतीश राऊळ ( तळवडे ) , समृद्धी अमित ठाकूर ( हळवल नं. १ ) , भूषण पांडुरंग गावकर ( नाटळ खांदार ) ,  यश हेमंत भरणकर व भाविका हेमंत भरडकर ( फोंडा बावीचे भाटले ) , हार्दिक सतीश राऊळ ( तळवडे ) ,  मधुरा अनंत सुतार ( घोणसरी नं. १ ) ,  ओमकार रमेश सूर्यवंशी ( ओझरम् नं. १ ) , तनिष्का दशरथ तावडे ( सांगवे गावकरवाडी ) , गणेश निलेश घाडीगावकर ( तरंदळे नं. १ ) ,  श्रावणी समीर चव्हाण ( कळसुली भोगनाथ ) , सलोनी सत्यवान कानडे व स्वरा सत्यवान कानडे ( शिवडाव मांगर ) अशा मुलांचा समावेश आहे. 

            यावेळी तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव व तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी विशेष आभार मानले आहेत. 



शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

कोवीड १९ मुळे निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदत

कोवीड १९ मुळे निधन झालेल्या पालकांच्या मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी आज शुक्रवार दि. ८/१०/२०२१ रोजी स.११.०० वा. शाळा सांगवे गावकरवाडी या शाळेतील विद्यार्थीनी कु.तनिष्का दशरथ तावडे हिला रु.२०००/-आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष सन्मा . श्री .व्ही .टी . सुतार सर ,शा.व्य.स.अध्यक्ष सन्मा . श्री. जयप्रकाश सावंत, उपाध्यक्षा सन्मा .सौ.वैष्णवी म्हापणकर, समिती शिलेदार सन्मा .श्री. जनार्दन मेस्त्री, सन्मा .सौ.जान्हवी मेस्त्री व  सन्मा . सौ .विनया पावले इ.उपस्थित होते.



🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...