रविवार, २६ मार्च, २०२३

🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा

🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेचा गुणगौरव सोहळा साजरा

🔹कणकवली शाखेचे शैक्षणिक , सामाजिक उपक्रम स्तुत्य : मान्यवरांनी केले कौतुक

🟣 बावीस दत्तक विद्यार्थ्यांना मिळाली अविस्मरणीय शैक्षणिक भेट

कणकवली : 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने कणकवली येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात दत्तक विद्यार्थी , गुणगौरव आणि शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान सोहळा पार पडला. 

त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. महान विभूतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कै. मंजिरी मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कणकवली शाखेच्या महिला आघाडीने सुस्वर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. 

तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी संघटनेच्या सर्व सामाजिक , शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांचा धावता आढावा घेतला. राज्य सरचिटणीस तथा महासचिव राजन कोरगावकर व शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव व माजी सरचिटणीस सुशांत मर्गज , तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , सरचिटणीस महेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर ,  ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण ,  जिल्हाध्यक्ष नारायण नाईक , ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर , शिक्षक नेते नंदकुमार राणे , जिल्हा नेते नितीन कदम , शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षा नीलम बांदेकर , महिला जिल्हाध्यक्षा निकिता ठाकुर , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सर्वांनी मुक्तकंठाने कणकवली शाखेच्या उपक्रमांचे कौतुक केले.  

शिष्यवृत्तीप्राप्त , नवोदय प्रविष्ठ आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कणकवली तालुक्यातील बावीस केंद्रातील बावीस गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १६ शैक्षणिक वस्तूंचा संच देण्यात आला. त्यावेळी त्यांचे पालक व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा समिती पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सत्यवान चव्हाण , विनायक जाधव , कल्पना मलये , सरिता पवार , सदाशिव राणे , राजेश कदम यांचा शाल , श्रीफळ , ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,शशिकांत कदम , संतोष गावडे , शाकीरा मुलानी  , रेश्मा गावकर , स्वप्नाली रावराणे , रंजना नारकर , आरती पारकर . सुप्रिया साळवी . हरिश्चंद्र सरमळकर यांचा शाल , श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यु ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या वीस शिक्षकांचा प्रमाणपत्र , ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अजित कदम आणि कार्यकारिणीतील शिलेदारांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आयोजित ‘ उंच माझा झोका ‘ या यु ट्यूब वरील सादरीकरणात सहभागी विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तालुका प्रवक्ते विनायक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटपर्यंत उपस्थित असणाऱ्या दहा भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉ पद्धतीने भेटवस्तू देण्यात आल्या. उपस्थित सर्वांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती. 






































































































































































































































































































































































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...