कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन तालुका कार्यकारिणीने आज सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठिक ४ वाजता कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. अरुणजी चव्हाणसाहेब आणि गटशिक्षणाधिकारी मा. किशोरजी गवससाहेब यांची त्यांच्या कार्यालयात नियोजित सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान तालुका तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माजी तालुका सरचिटणीस मा. संतोष कांबळे यांनी भेटीचा उद्देश स्पष्ट केला. नूतन तालुकाध्यक्ष मा. सुशांत मर्गज, तालुका सरचिटणीस मा. निलेश ठाकूर, महिला अध्यक्षा मा. दर्शना हुंबे, महिला सचिव मा. सारिका पवार आणि शिक्षकनेते मा. टोनी म्हापसेकर यांच्यासह सर्व तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांच्याकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी या दोघांनीही सन २०२५ ते सन २०२८ या कालावधीसाठी निवड झालेल्या नूतन तालुका कार्यकारिणीचे (महिला आघाडीसह) अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर योग्य अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
भेटीदरम्यान विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यात शैक्षणिक योजनांच्या आकर्षक रील्स तयार करणे, शाळांना प्लास्टिकमुक्त करणे, तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त शाळांची अंमलबजावणी आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांवर विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यात आले. तालुकाध्यक्ष मा. सुशांत मर्गज यांनी संघटनेची आगामी धोरणे आणि वाटचाल स्पष्ट केली. तालुका सरचिटणीस मा. निलेश ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.
या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी शिक्षकनेते टोनी म्हापसेकर, जिल्हा महिला अध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनायक जाधव, संतोष कुडाळकर, माजी तालुका महिला अध्यक्षा नेहा मोरे, तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर, महिला तालुका अध्यक्षा दर्शना हुंबे, महिला सचिव सारिका पवार, शिक्षक बँकेचे संचालक श्रीकृष्ण कांबळी, तालुका कार्याध्यक्ष संतोष कांबळे, संदिप गोसावी, धीरज हुंबे, ईश्वरलाल कदम, सुनिल गावकर, प्रवीण कदम, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ घाडीगावकर, तालुका कार्यालयीन चिटणीस संतोष राणे, तालुका संपर्क प्रमुख दिनेश जंगले, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुबल, तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत, तालुका अंतर्गत हिशेब तपासनीस नंदकुमार सरंगले, तालुका सल्लागार शिवाजी मडव, महिला कार्याध्यक्षा कविता बुचडे, तालुका कोषाध्यक्षा आरती कांबळी, तालुका कार्यालयीन चिटणीस सविता आर्लेकर, तालुका प्रवक्त्या मयुरी राणे, तालुका संपर्क प्रमुख रश्मी आंगणे, फोंडा प्रभाग उपाध्यक्षा स्नेहल गोसावी, कनेडी प्रभाग उपाध्यक्षा अनुजा कदम, तळेरे प्रभाग उपाध्यक्षा श्रिया गोसावी यांच्यासह अनेक तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
याव्यतिरिक्त समितीचे शिलेदार आणि समितीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर आणि नारकर यांनीही या भेटीमध्ये आपली उपस्थिती दर्शविली.


























































