रविवार, २९ मार्च, २०२६

कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न

 🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* 

कणकवली: 

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा-कणकवली महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला 'सखी संवाद' हा विशेष कार्यक्रम नुकताच येथील एचपीसीएल हॉलमध्ये अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. "लेकी महाराष्ट्राच्या, शिलेदार शिक्षक समितीच्या" या ब्रीदवाक्याला जागृत ठेवत, तालुक्यातील महिला शिक्षिकांनी या सोहळ्याला अभूतपूर्व गर्दी करत आपली संघटनात्मक ताकद दर्शविली.

          हा कार्यक्रम जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, कणकवली शिक्षक नेत्या नेहा मोरे आणि तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महिला आघाडी तालुका अध्यक्षा दर्शना धीरज हुंबे आणि सचिव मयुरी हेमंत राणे यांनी सक्षम नेतृत्व केले. या सोहळ्याला जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे व अजय तांबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी, ऋतुजा जंगले व महेंद्र पावसकर, जिल्हा विभागीय अध्यक्ष किशोर गोसावी, सल्लागार संदीप गोसावी,जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम आणि सचिव निलेश ठाकूर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

          तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी तालुका कार्याध्यक्षा कविता उदय बुचडे, तालुका कोषाध्यक्षा आरती प्रसाद कांबळी व प्रकाश वाडकर, कार्यालयीन सरचिटणीस सुभाष गावकर, तालुका कार्यालयीन चिटणीस सविता आर्लेकर, संपर्कप्रमुख दिनेश जंगले, तालुका संपर्कप्रमुख रश्मी आंगणे, कनेडी विभागीय अध्यक्ष सुनील गावकर आणि तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत यांनी विशेष सहकार्य केले. यासोबतच प्रभाग स्तरावरून कणकवली प्रभाग उपाध्यक्षा मानसी राणे, फोंडा प्रभाग उपाध्यक्षा स्नेहल संदीप गोसावी, कनेडी प्रभाग उपाध्यक्षा अनुजा कदम, हुंबरठ प्रभाग उपाध्यक्षा स्नेहा संतोष राणे, तळेरे प्रभाग अध्यक्ष जान्हवी परब यांच्या परिश्रमातून हा सोहळा अत्यंत नेटका पार पडला.

          कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मीनाक्षी वरवडेकर यांनी केले. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेल्या 'खेळ पैठणीचा' या आनंददायी उपक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन समिती शिलेदार दिनेश पाटील यांनी केले. या स्पर्धेत महिला भगिनींनी मोठ्या आवडीने आणि उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत *ज्योत्स्ना गावडे यांनी प्रथम, श्रेया ठाणेकर यांनी द्वितीय तर स्वराशा कासले* यांनी तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. विजेत्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

          याच सोहळ्याचे औचित्य साधून 'तिळगूळ समारंभ' देखील पार पडला, ज्यामध्ये परस्परांना शुभेच्छा देऊन स्नेह वृद्धिंगत करण्यात आला. तालुक्यातील सर्व महिला भगिनींना एकत्रित आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शेवटी सचिव मयुरी राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या आगळ्यावेगळ्या संवाद सोहळ्यामुळे महिला शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.




शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

🔴 कणकवली येथे शिक्षकांसाठी 'शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा' संपन्न; प्रसिद्ध गणिततज्ज्ञ

🔴 कणकवली येथे शिक्षकांसाठी 'शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा' संपन्न; प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन* 

​कणकवली:

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (शाखा-कणकवली) आणि पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला 'शिष्यवृत्ती एकदिवसीय मार्गदर्शन वर्ग' आज शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी प.पू. भालचंद्र महाराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

          ​कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध गणिततज्ज्ञ मा. श्री. पंढरीनाथ राणे उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना गणितातील प्रश्नांची अचूक उत्तरे कमी वेळात कशी मिळवता येतील, याचे तंत्र त्यांनी शिक्षकांना अवगत करून दिले.

🔹मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक

          ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला कणकवली शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थित असलेले गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि केंद्रप्रमुख विजय भोगले यांनी शिक्षक समितीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले व आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.

 🔸​उपस्थित मान्यवर

         यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे, तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, महिला तालुकाध्यक्षा दर्शना हुंबे, धीरज हुंबे, अजय तांबे, जगदीश गोसावी, केंद्रप्रमुख विजय भोगले, तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर, शिक्षक नेत्या नेहा मोरे, प्रवीण कुबल, गटसाधन केंद्राच्या प्रज्ञा दळवी, पाळेकर, तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी संदीप कदम, संतोष मराठे, रचना गवाणकर आणि मंगेश खांबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक पतपेढीचे जिल्हाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, ईश्वरलाल कदम यांनीही मार्गदर्शन घेतले. 

▪️​ नियोजन आणि सहभाग

          ​कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री व शिक्षिका सरिता पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अजय तांबे यांनी मानले. या कार्यशाळेला कणकवली तालुक्यातील सुमारे ८० शिक्षकांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. 'न्यायाची चाड, त्याग आणि सेवा' या ब्रीदवाक्यानुसार शिक्षक समितीने राबवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.




























































🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...