मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

शिक्षक समिती कणकवलीचा शालेय विद्यार्थीनीला मदतीचा हात

 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

शिक्षक समिती कणकवलीचा शालेय विद्यार्थीनीला मदतीचा हात

🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼

*गुरुवार दि.१४ जानेवारी :-* 

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

        *जिल्हा परिषद शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी ता. कणकवली या प्रशालेत इ .४थी मध्ये शिकणारी कु.तनिष्का तुकाराम परब* ही विद्यार्थीनी पडल्याने तिचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन उपचाराअंती तिच्या हाताला प्लास्टर घालण्यात आले.

         सदर विद्यार्थिनीची *घरची परिस्थिती खूपच बिकट* असून त्या कुटुंबाला *आर्थिक मदतीची गरज* असल्याबाबत शाळेतील शिक्षकांनी संघटनेशी संपर्क साधल्यानंतर कु. तनिष्का च्या पालकांशी संपर्क करून आज गुरुवार दि.१४ जानेवारी रोजी *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने तालुका सल्लागार सन्मा.श्री.अनिल सावंत यांचे हस्ते कु.तनिष्का हिला रु.५०००/- ची आर्थिक मदत करण्यात आली .* 

         सदर प्रसंगी शिक्षक नेते श्रीे. गिल्बर्ट फर्नांडिस,  तालुकाध्यक्ष श्री.विनायक जाधव, जिल्हा विभाग अध्यक्ष श्री.महेंद्र पवार, जिल्हा संघटक श्री.दिलीप शेळकेे, कार्याध्यक्ष श्री.संतोष तांबे, श्री.राजेन्द्रप्रसाद मणेरीकर, कार्यालयीन सचिव श्री.महेश चव्हाण, उपाध्यक्ष.श्री.विजय पाताडे, विभाग अध्यक्ष श्री.राजाराम भिसे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण कांबळी, केंद्र संघटक श्री.जगन्नाथ घाडीगांवकर, ज्येष्ठ सदस्य श्री.धीरज हुंबे, श्री.सदाशिव राणे, श्री.अभय वालावलकर, श्री.उत्तम सातवसे, श्री.श्रीकांत बुचडे आदी समिती सदस्य उपस्थित होते.


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


                 अध्यक्ष / सचिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

                    कणकवली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...