शिक्षक समिती कणकवलीच्या "गाऊ आनंदे" या उपक्रमातील सहभागी सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा खर्च करणार :
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व तालुक्याचे सल्लागार सन्मा. श्री. प्रदिप मांजरेकर सर
कणकवली : दिनांक : १४ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीने विविध उपक्रम राबविण्यात नेहमी सातत्य राखले आहे .हे उपक्रम यशस्वी होण्याकरीता संघटनेच्या अनेक शिलेदारांचे हात स्वयंस्फूर्तीने तन , मन आणि धन देऊन नेहमीच सरसावलेले असतात .असेच एक दातृत्व , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व तालुक्याचे सल्लागार सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर.
सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर यांनी "गाऊ आनंदे" या उपक्रमातील सहभागी सर्व समिती शिलेदारांकरीता Four colour मध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची इच्छा संघटनेकडे व्यक्त केली आहे ; त्यासाठीचा सर्व खर्च ते करणार आहेत . सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर यांच्या या संघटनात्मक व आर्थिक सहकार्याबद्दल शिक्षक समिती कणकवली आभारी आहे .
🙏 धन्यवाद 🙏
###################
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
कणकवली
###################
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा