मान. मुख्यमंत्री महोदयांशी शिक्षक समिती प्रतिनिधींशी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा....
_सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन..._
राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवराव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्र्वभूमीवर सोमवारी (ता. २ आॅगस्ट) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींनी राज्याध्यक्ष उदयराव शिंदे आणि मार्गदर्शक मा. विश्वनाथजी मिरजकर यांचे नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे भेट घेतली. यावेळी कोकण, सांगली, कोल्हापूर येथील अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे पत्र मा. मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले. सामाजिक दायित्वाच्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे कौतुक केले.
मा. मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे साहेबांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन संक्षिप्त चर्चा करण्यात आली.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील शिक्षक वेतन निश्चितीच्या तृटी, बक्षी समिती खंड-२, शिक्षण सेवक मानधन वृद्धी, पूर्वाश्रमीच्या वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न, आंतरजिल्हा बदली पोर्टल सुरू करणे, १०% रिक्त जागा अट रद्द करून आंतरजिल्हा बदली टप्पा ५ वा सुरू करणे, आंतरजिल्हा बदली झालेल्यांना कार्यमुक्त करणे, संचमान्यता निकष दुरूस्ती, जिल्हांतर्गत बदली आदेशात दुरुस्ती करून प्रक्रिया पार पाडणे, केंद्र प्रमुख भरतीची जून २०१४ अधिसूचना रद्द करून सर्व रिक्त जागा शिक्षकांतून १००% भरणे, उच्च शैक्षणिक अर्हता धारक शिक्षकांना विविध जागांवर पदोन्नती मिळणे, विषय पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी, MS-CIT मुदतवाढ, अर्जित रजा रोखीकरण, केंद्रानुसार पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता, नपा/मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी १००% अनुदान व स्वतंत्र वेतन पथक, अशैक्षणिक कामांतून मुक्तता, समग्र शिक्षा अभियान शाळा अनुदान वाढ, विद्यार्थ्यांना भेदभाव न करता मोफत गणवेश व लेखन साहित्य, उपस्थिती भत्ता वाढ अशा ३५ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येऊन मुद्देनिहाय संक्षिप्त चर्चा करण्यात आली.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागांना निर्देश देऊन सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले.
मा. मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांचे भेटीप्रसंगी राज्य संघटक सयाजीराव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, किरण गायकवाड, सांगली बॅंक चेअरमन यु टी जाधव, शशीकांत भागवत, सातारा बॅंकेचे संचालक किरण यादव, सांगली बॅंक माजी चेअरमन शशिकांत बजबळे उपस्थित होते....
विजय कोंबे
(राज्य सरचिटणीस)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा