कणकवली : ३१ डिसेंबर २०२१
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने सातत्याने विद्यार्थी ,शिक्षक ,समाज या सर्व घटकांचे हितार्थ नवनवीन उपक्रमांचे आयोजन करुन ते यशस्वी करत असते.देशभक्तीपर गीयगायन पंधरवडा , खजिना कथांचा कलांकुर (कार्या . आधारित ) , गाऊ आनंदे ( मराठी कविता गायन ) , कोरोना कालावधीत विविध स्तरावर मदतकार्य , दत्तक विद्यार्थी , शिष्यवृत्ती सराव परीक्षा , रक्तदान शिबिर अशा अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या या माझ्या कणकवली शाखेचा मला अभिमान आहे.
सन 2022 या नवीन वर्षाच्या प्रथम दिना पासून आपल्या विद्यार्थ्यांसाठी Let's Learn English हा व्याकरणावर आधारीत उपक्रम आपण शुभारंभीत करत आहात.सन्मा.प्रदीप मांजरेकर, सन्मा.संतोष कुडाळकर , सन्मा. आनंद तांबे, सन्मा.महेंद्र पवार यांसर्वाबरोबरच तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक विद्यार्थीहितासाठी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडतीलच. या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद .
कणकवली तालुकाध्यक्ष सन्मा.विनायक जाधव , सचिव सन्मा.सुशांत मर्गज यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वैभवात भर घालणाऱ्या तुम्हा सर्व कणकवलीकरांना मनःपूर्वक अभिवादन.
तुमचा भाई चव्हाण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा