(कणकवली दि .३१ डिसें .२०२१)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले. यातील अनेक उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित होते .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेत असताना, इंग्रजी यासारख्या विषयाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे व्हावी , यासाठी इंग्रजी व्याकरणावर भर देऊन विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल ,असा नवीन उपक्रम शनिवार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे ......." Let's Learn English ".
या उपक्रमाचे प्रमुख आहेत सन्मा. श्री.प्रदीप मांजरेकर सर ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ) व सन्मा. श्री. संतोष कुडाळकर सर तसेच तंत्र सहाय्य करताहेत सन्मा. श्री.आनंद तांबे सर ( संचालक )व श्री. महेंद्र पवार सर .या उपक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या, माझ्या समिती शिलेदारांनी या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला आहे त्यापैकी अनेक जणांनी स्वतःच तंत्रसहाय्य ( व्हिडिओ निर्मिती) केलं आहे. आम्हांला खात्री आहे शिक्षक समिती कणकवलीचा हा उपक्रम, निश्चितच सर्वांना मार्गदर्शक ठरेल.
(Happy New year 2022)
अध्यक्ष /सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली
Best luck
उत्तर द्याहटवा