शनिवार, २३ जुलै, २०२२

सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक समितीचा मदतीचा हात

सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक समितीचा मदतीचा हात

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

          वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पित्याचे छ्त्र हरपलेल्या मुलाला शिक्षक समिती कणकवलीने सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदतीचा हात दिला.

         जि.प.शाळा तिवरे खालचीवाडी शाळेमध्ये शिकत असलेल्या कु.ठाणेश संतोष चव्हाण या मुलाच्या वडीलांचे दोन महिन्यांपुर्वी दुःखद निधन झाले. तसेच त्यापूर्वी त्याच्या आईचेही निधन झालेे आहे. अचानक दुःखाचा डोंगर या मुलावर कोसळला. सदर कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अशावेळी त्याला आर्थिक मदतीची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीकडून तातडीची मदत म्हणून रु. ५००० मदत निधीचा धनादेश शाळा तिवरे खालचीवाडी येथे तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांचे हस्ते या मुलाजवळ सुपुर्द करण्यात आला. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम शिक्षक समिती कणकवलीने केले.

          सदर प्रसंगी शिक्षक समिती कणकवलीचे सरचिटणीस महेंद्र पवार, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर, कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, विभागीय अध्यक्ष हेमंत राणे, केंद्र संघटक राजेंद्र कवडे, ज्येष्ठ सदस्य विजय पाताडे, अजीत कदम, सुनील कदम, श्रीकांत बुचडे, शाळेचे मुख्याध्यापक विजय शिरसाट, विजय मेस्त्री शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, माजी सरपंच इत्यादी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...