महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवली " बालिका दिन " साजरा करणार
कणकवली :
बालिका दिन सप्ताह साजरा करण्यासाठी शिक्षक समिती कणकवली तालुक्याने " कर्तबगार महिलांच्या वेशभुषा " हा उपक्रम निवडला आहे . या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना सहभागी करून व्हिडिओ पाठविणार आहेत. जे शिक्षक / शाळा सहभागी होणार आहेत त्यांनी शाळेचे नाव व कोणाची वेशभुषा करणार ते नाव कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुका स्तरावर आलेल्या व्हिडिओ मधून उत्कृष्ट असलेला व्हिडिओ जिल्हा महिला आघाडीकडे पाठवून प्रसारित करण्यात येणार आहे. जिल्हा महिला कार्यकारिणीकडे पाठवायचा व्हिडिओ निवडण्याचे अधिकार महिला आघाडी तालुका कार्यकारिणीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त शाळांनी उंच माझा झोका या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समिती महिला आघाडी तालुकाध्यक्षा नेहा मोरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा