मंगळवार, ७ मार्च, २०२३

तातडीची सभा शिक्षक समिती कणकवली अपडेट

 .                      तातडीची सभा

    शिक्षक समिती कणकवली अपडेट

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

       दिनांक 7 मार्च 2023 रोजी सायं. ४:३० वा. जि.प.शाळा कलमठ बाजारपेठ येथे  कार्यकारिणी सदस्य व BLO आदेशीत शिक्षकांची तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

👉🏼 BLO चे काम नाकारणाऱ्या शिक्षकांना तहसीलदाराकडून अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, याबाबत वकिलांचे मार्गदर्शन घेऊन सदरचे काम तूर्तास स्वीकारणे आणि नंतर सदरचे काम करण्याची सक्ती करत असल्याबाबत संघटनेच्या वतीने BLO शिक्षकांसमवेत कोर्टामध्ये केस दाखल करावी. याच्या खर्चासाठी नीधी उभारण्यात यावा असे ठरविण्यात आले.

👉🏼 तसेच अशैक्षणिक कामे लादत असल्याबाबत संघटनेच्या वतीने मा. प्रांताधिकारी यांना धरणे आंदोलनाची नोटीस देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.


👉🏼 दिनांक 8 मार्च 2023 रोजी याबाबत वकिलांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी दिनांक 9 मार्च 2023 रोजी मा. प्रांताधिकारी यांना आंदोलनाची नोटीस देण्यात येईल.

👉🏼 दिनांक १४ मार्च २०२३ पासून जुनी पेन्शन च्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक समिती सामिल आहे . त्यामुळे हा संप यशस्वी करण्यासाठी १०० % शिक्षकांनी संपामध्ये उतरावे अशा प्रकारचा निर्णय घेऊन त्याबद्दलत्याबाबत चे नियोजन करण्यात यावे असे ठरविण्यात आले.

विनम्र

                    अध्यक्ष / सचिव

             शिक्षक समिती कणकवली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...