बुधवार, २ जुलै, २०२५

प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना BLO नेमणुकीमधून वगळण्याबाबत विनंती पत्र नमुना

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली

जावक क्र.

दि.०३/०७/२०२५

प्रति,

मा. तहसीलदार साहेब,

कणकवली तालुका,

जिल्हा – सिंधुदुर्ग

विषय: प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना BLO नेमणुकीमधून वगळण्याबाबत विनंती

महोदय,

आपणास विनम्र विनंती करण्यात येत आहे की, सध्या कणकवली तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ. (Booth Level Officer) म्हणून नेमणूक देण्यात आलेली आहे. तथापि, हे काम पूर्णतः अशैक्षणिक असून, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

पुढील काही प्रमुख वैयक्तिक अडचणी अनेक शिक्षक बंधूंना भेडसावत आहेत:

 * मुख्याध्यापक चार्जवर असणे,

 * एकाच शाळेत एकच शिक्षक असणे,

 * दोन्ही शिक्षकांना BLO नेमले जाणे,

 * शारीरिक दिव्यांग असणे,

 * शाळेपासून खूप दूर BLO क्षेत्र देण्यात आले असणे,

 * गंभीर आजारामुळे वैद्यकीय अडचणी असणे.

त्याअनुषंगाने, काही शिक्षकांच्या निवेदनांसह आम्ही संघटनेमार्फत एक संकलित यादी सोबत सादर करत आहोत. कृपया या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, सदर शिक्षकांना BLO कामातून मुक्त करण्यात यावे, अशी नम्र विनंती करीत आहोत.

आपण याबाबत योग्य पातळीवर कार्यवाही करून, शिक्षकांचे शैक्षणिक कार्य सुरळीत पार पाडण्यास मदत कराल, अशी अपेक्षा.

आपला नम्र,

श्री.सुशांत मर्गज.

अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली

मो. नं. : ९४२०२०६३२६

श्री.निलेश ठाकूर

सचिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली

मो. नं. : ९४२१९१९०७८

सोबत:

१) अडचणी असलेल्या शिक्षकांची यादी

२) शिक्षकांचे वैयक्तिक अर्ज


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...