🔴 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांचा सत्कार
कणकवली: कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचे सुपुत्र आणि पूर्वाश्रमीचे प्राथमिक शिक्षक असलेले श्री. जयप्रकाश अनंत परब यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कणकवली शाखेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष श्री. सुशांत मर्गज यांनी श्री. परब यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्री. परब यांनी "मी शिक्षकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन," असे आश्वासन दिले, ज्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या स्नेहमिलनावेळी श्री. अरुण चव्हाण (गटविकास अधिकारी, कणकवली), श्री. टोनी म्हापसेकर (शिक्षक नेते), सौ. दर्शना हुंबे (महिला आघाडी अध्यक्षा), श्री. निलेश ठाकूर (सचिव), श्री. धीरज हुंबे (जिल्हा उपाध्यक्ष), श्री. किशोर गोसावी (विभागीय उपाध्यक्ष), श्री. श्रीकृष्ण कांबळी (शिक्षक सहकारी पतपेढी संचालक), श्री. ईश्वरलाल कदम (जिल्हा संघटक), श्री. सचिन सावंत (कोषाध्यक्ष), श्री. सुभाष गावकर (कार्यालयीन चिटणीस), श्री. सुनील गावकर (नाटळ विभागीय अध्यक्ष) आणि श्री. प्रवीण कदम (सदस्य) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान शिक्षक बांधवांमध्ये अभिमानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
माहिती व प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा