शनिवार, २३ जुलै, २०२२
🛑 शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न
🛑 शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न
' न्यायाची चाड व अन्यायाची चीड ' हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
२२ जुलै २०२२ रोजी शिक्षक समितीच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुका शाखा कणकवलीच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा जानवली मारुती मंदिर येथे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम व इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक समिती कणकवली सातत्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिक्षक समिती कणकवली ने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ केला. समितीच्या अनेक उपक्रमशील शिक्षक सदस्यांच्या सहकार्यातून शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करणार्या व्हिडिओची निर्मिती करून ते व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला यूट्यूब चैनलवर प्रसारित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्व विद्यार्थी - शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप धामापुरकर, प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष कुडाळकर, अजय तांबे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, उपाध्यक्ष सदानंद ठाकूर, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, महिला आघाडी सचिव नेहा मोरे, कार्यालयीन चिटणीस समीर पाटील, सहसचिव संतोष कांबळे, विभाग अध्यक्ष हेमंत राणे, प्रसिद्धीप्रमुख प्रविण कुबल, कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणारे जानवली मारुती मंदिर शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर, उपक्रमशील शिक्षिका मंजिरी मराठे, सुजाता साटविलकर, राजेश कदम, सुशांत मर्गज, सचिन सावंत, संदीप जाधव, संदीप गोसावी, स्नेहल गोसावी, श्रीकृष्ण कांबळी आदी समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक समितीचा मदतीचा हात
सामाजिक बांधिलकी जोपासत शिक्षक समितीचा मदतीचा हात
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे पित्याचे छ्त्र हरपलेल्या मुलाला शिक्षक समिती कणकवलीने सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदतीचा हात दिला.
जि.प.शाळा तिवरे खालचीवाडी शाळेमध्ये शिकत असलेल्या कु.ठाणेश संतोष चव्हाण या मुलाच्या वडीलांचे दोन महिन्यांपुर्वी दुःखद निधन झाले. तसेच त्यापूर्वी त्याच्या आईचेही निधन झालेे आहे. अचानक दुःखाचा डोंगर या मुलावर कोसळला. सदर कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अशावेळी त्याला आर्थिक मदतीची गरज ओळखून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीकडून तातडीची मदत म्हणून रु. ५००० मदत निधीचा धनादेश शाळा तिवरे खालचीवाडी येथे तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांचे हस्ते या मुलाजवळ सुपुर्द करण्यात आला. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम शिक्षक समिती कणकवलीने केले.
सदर प्रसंगी शिक्षक समिती कणकवलीचे सरचिटणीस महेंद्र पवार, जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर, कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, विभागीय अध्यक्ष हेमंत राणे, केंद्र संघटक राजेंद्र कवडे, ज्येष्ठ सदस्य विजय पाताडे, अजीत कदम, सुनील कदम, श्रीकांत बुचडे, शाळेचे मुख्याध्यापक विजय शिरसाट, विजय मेस्त्री शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, माजी सरपंच इत्यादी उपस्थित होते.
कु. ठाणेश संतोष चव्हाण शाळा तिवरे खालचीवाडी या विद्यार्थ्यांला आर्थिक मदतीसाठी रुपये 5000/- धनादेश सुपूर्द करण्यात आले
कु. ठाणेश संतोष चव्हाण शाळा तिवरे खालचीवाडी या विद्यार्थ्यांला आर्थिक मदतीसाठी रुपये 5000/- धनादेश सुपूर्द करण्यात आले.
गुरुवार, २१ जुलै, २०२२
शिक्षक समितीचा डायमंड जुबली सोहळा
🛑 शिक्षक समितीचा डायमंड जुबली सोहळा
🔵 शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने हिरक महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम
🟢 कणकवली :
२२ जुलै १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना झाली. आज या गोष्टीला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. साठावा वर्धापन दिन म्हणजेच हिरक महोत्सवी दिन.
कणकवली शाखेच्या वतीने आज मारुती विद्यामंदिर ( जानवली ) या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे. ' झाडे लावा , झाडे जगवा ' हा पर्यावरण संतुलन संदेश देत समितीचे शिलेदार एक सामाजिक उपक्रम राबवित आहेत.
त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे मराठी , गणित , इंग्रजी , बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर आधारित व्हिडिओ निर्मितीच्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ आजच्या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे. हे व्हिडिओ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक असणार आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडिओंचा उपयोग नवोदय , MTS , मंथन आणि MPSC साठी देखील उपयुक्त ठरणार आहेत.
सदर उपक्रमांमध्ये सर्व समिती शिलेदार उत्स्फूर्त सहभाग घेत हिरक महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरे करणार आहेत.
©️ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , तालुका शाखा कणकवली
बुधवार, १३ जुलै, २०२२
गंभीर आजारी विद्यार्थिनीला समितीने दिला आर्थिक मदतीचा हात
शिक्षक समिती कणकवली अपडेट
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
जि.प.शाळा खारेपाटण नं.१ ची विद्यार्थीनी कु.सारंगी संतोष कानडे, इयत्ता - सहावी ही गंभीर आजारी असून तिची घरची परिस्थिती गरीबीची आहे. सदर विद्यार्थिनीवर मुंबई येथे उपचार चालू असून तिचे पालक तिच्यासोबत असल्याने संघटनेमार्फत देण्यात येणारा रु.5000 आर्थिक मदतीचा चेक आज खारेपाटण नं.१ शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रावणकर सर यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.
सदर प्रसंगी अध्यक्ष श्री.टोनी म्हापसेकर, सरचिटणीस श्री. महेंद्र पवार, संचालक श्री.आनंद तांबे, प्रवक्ता श्री.विनायक जाधव, श्री.संदिप गोसावी, श्री. प्रकाश बुचडे, श्री. श्रीकृष्ण ठाणेकर आदी उपस्थित होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
शाखा कणकवली
शनिवार, २ जुलै, २०२२
🟢 कार्यकारिणी सभा : शनिवार दि. 2 जुलै 22
🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा अपडेट
🟢 कार्यकारिणी सभा : शनिवार दि. 2 जुलै 22
🔵 कणकवली :
कणकवली नं.३ शाळेत सभा दुपारनंतर 4 वाजता सुरु झाली. तालुका सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी सर्व पदाधिकारी आणि शिलेदार यांचे *शाब्दिक स्वागत* केले.
तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर यांनी सभेचे *प्रास्ताविक* केले व सर्वांचे शाब्दिक स्वागत केले. त्यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.
तालुका सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी *मागील सभेचे इतिवृत्त* सविस्तर वाचून दाखवले. इतिवृत्त उत्तम लिहिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.मागील झालेला संपूर्ण जमाखर्च , संवर्धन निधी , वाढदिवस निधी याचे सविस्तर वाचन माजी तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले. याबाबत विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन पदाधिकारी यांनी केले. शिल्लक रकमेचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.
नूतन *उपक्रम शिष्यवृत्ती मार्गदर्शन* यावर चर्चा झाली. उपक्रम प्रमुखांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केलेली आहे. उपक्रमात सहभागी सर्व शिक्षक शिक्षिका शिलेदारांनी निवडलेल्या घटकांवर व्हिडिओ निर्मिती करण्यास आरंभ केलेला असेल अशी शक्यता वर्तविण्यात आली. त्यावर पुढील कार्य करुन व्हिडीओ प्रसारित करण्याच्या दृष्टीने तयार ठेवावा असे सुचविण्यात आले. ज्या शिलेदारांची यात नावे आहेत त्यांनी आपल्या उपक्रम ग्रुपवर कार्यरत राहण्याविषयी चर्चा झाली. याविषयी एखादी ऑनलाईन मिटिंग घेण्याबाबत सूचना करण्यात आली.
काही महिला सदस्यांची जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी तालुका पदांचे लेखी राजीनामे सादर केले. त्यावर सखोल चर्चा झाली. *रिक्त पदांवर नवीन महिलांची* निवड पुढील सभेत होऊ शकेल.
लवकरच होणाऱ्या *शिक्षक पतपेढी निवडणुकीसंदर्भात* शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर , माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सभागृहाला संबोधित केले. यावर सखोल चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
*शालेय गणवेश अनुदान* न मिळता वितरण केल्याबद्दल चर्चा झाली. याबाबत विविध ठिकाणी शासनाने आदेश काढल्यामुळे तात्पुरता समारंभपूर्वक कार्यक्रम संपन्न केल्याचे सांगण्यात आले. संघटनेने याबाबत वेळीच सूचना द्यायला हवी होती अशीही सूचना मांडण्यात आली.
*गॅस अनुदान निधीबाबत* ही प्रत्येक तालुक्यात वेगवेगळा निधी आणि कार्यवाही सुरु असल्याचे समोर आले.
*शिक्षक वाढदिवस निधी* चा उपयोग कशासाठी करावा यावर सविस्तर चर्चा झाली. अधिवेशनात झालेल्या खर्चाचे विवरण करण्यात आले. त्यातील भोजन वितरणावर अधिक चर्चा झाली.
*गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप* करताना यापुढे मुलांना चप्पल निधी देताना तो शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द करण्याबाबत ठरविण्यात आले.
ज्या काही बाबी जिल्हा संघटनेच्या कक्षेत येत असल्याने त्याबाबत जिल्हा संघटनेला लेखी कळवण्यात येईल असे तालुकाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर यांनी सांगितले.
या सभेला बहुसंख्य पदाधिकारी व शिक्षक शिलेदार उपस्थित होते. चर्चेत बहुसंख्य शिलेदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शेवटी सरचिटणीस मा. महेंद्र पवार यांनी सर्वांचे *आभार* मानले.
🛑 तालुका प्रसिद्धी प्रमुख
यातील सविस्तर शब्दांकन पुढील सभेतील इतिवृत्तात प्रत्यक्ष समजेलच. हा विषयानुसार सारांश आहे. तरीही काही बाबींचा उल्लेख करावयाचा राहून गेला असल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...














































