सोमवार, ३० जानेवारी, २०२३

🛑 मुलांनो , नेहमी गुणवत्तेशी स्पर्धा करा : राज्याध्यक्ष उदय शिंदे

🛑 मुलांनो , नेहमी गुणवत्तेशी स्पर्धा करा : राज्याध्यक्ष उदय शिंदे

🔹महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे जिल्हास्तरीय आयोजन

 ▪️कणकवली नं.५ शाळेत संपन्न झाला जिल्हास्तरीय उदघाटन सोहळा

कणकवली : 

          " महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने राबवलेला शिष्यवृत्ती सराव परीक्षा उपक्रम स्तुत्य असून समितीचे शिलेदार संघटनेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. मुलांनो , तुम्ही खूप भाग्यवान आहात. स्पर्धा करताना संघर्ष करावा लागतो. अशा वेळी तुम्ही गुणवत्तेशी स्पर्धा करा. स्वतःशी स्पर्धा करा आणि यश संपादन करा " असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले. 

          शिक्षक समिती नेहमीच विविध शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या जिल्हा परिषद शाळेतील पाचवीच्या मुलांसाठी सराव परीक्षेचे आयोजन जिल्हाभर करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर अतिशय नियोजनबद्ध परीक्षा घेण्यात आल्या. 

          उद्घाटन समारंभाला राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर , शिंपी गुरुजी , सयाजी पाटील ,  जिल्हाध्यक्ष नारायण नाईक , जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर,  शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , तालुका सरचिटणीस महेंद्र पवार , महिला आघाडी तालुकाध्यक्षा नेहा मोरे , तालुका प्रवक्ते विनायक जाधव , प्रशांत दळवी , दिनेश सुद्रीक , कल्पना मलये , लक्ष्मण पावसकर , प्रवीण कुबल , परीक्षार्थी विद्यार्थी आणि समितीचे शिलेदार उपस्थित होते. 

          प्रास्ताविक तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी केले. त्यात त्यांनी समितीच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कणकवली , जानवली , पियाळी , साळीस्ते , कासार्डे , खारेपाटण आणि फोंडा इत्यादी परीक्षा केंद्रांना पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. कणकवली तालुक्यातील केंद्रांवर सर्व परिक्षार्थींच्या भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती.


























































































































































































































































































मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

🛑 अपघातग्रस्त विद्यार्थ्याला शिक्षक समितीचा मदतीचा हात

🛑 अपघातग्रस्त विद्यार्थ्याला शिक्षक समितीचा मदतीचा हात

कणकवली :      

          जि.प.शाळा बावशी नं. १ मधील सोहम भरत कांडर या विद्यार्थ्याचा पडल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला होता. सदर विद्यार्थ्याची परिस्थिती गरीबीची असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने ३०००/- ची आर्थिक मदत शाळेतील शिक्षक विनोद ठाकूर यांच्या मागणीनुसार त्यांचेजवळ देण्यात आली.

          सदर प्रसंगी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , सरचिटणीस महेंद्र पवार , महिला आघाडी अध्यक्ष नेहा मोरे , सचिव विनिता शिरसाट , संचालक आनंद तांबे , जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर इ. उपस्थित होते.



शनिवार, ७ जानेवारी, २०२३

🛑 सर्व समिती शिलेदारांची साथ मिळते आहे ही मोलाची गोष्ट आहे : तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर

🛑 सर्व समिती शिलेदारांची साथ मिळते आहे ही मोलाची गोष्ट आहे : तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर

🔹कणकवली कार्यकारिणीची सभा संपन्न

कणकवली : 

          भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र. ३ मध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची कणकवली तालुका शाखेची सभा संपन्न झाली. शिक्षक समिती कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी संघटनात्मक आढावा घेतला. BLO प्रश्न , आजारी शिक्षकांच्या इलेक्शन ऑर्डर रद्द करणे , हर घर तिरंगा : घरी झेंडे वाटण्यास विरोध करणे आणि अशा विविध प्रश्नांवर संघटनेने केलेले कार्य विशद केले. विविध संघटनात्मक प्रश्न एकजुटीने सोडविण्याचा प्रयत्न करत राहणे हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे , असे ते म्हणाले.



























शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

🛑 बालिका दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा महिला आघाडी सिंधुदुर्ग राबवणार नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम

🛑 बालिका दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती  जिल्हा महिला आघाडी सिंधुदुर्ग राबवणार नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम

🔹 उपक्रम : मिळून साऱ्याजणी 

सिंधुदुर्गनगरी : 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन अर्थात बालिका दिन संपन्न होत असतो. या दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी आपल्या उपक्रमांचा शुभारंभ करत आहे.

🪷 उपक्रम एक - रंग अनेक

          या उपक्रमात दर दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षक समितीच्या  तालुका महिला आघाडी तर्फे तालुक्याचे एक उत्कृष्ट सादरीकरण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहे.या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आठही तालुक्यांचे सादरीकरण साचेबंद न राहता वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील बालिका आपली कला सादर करणार आहेत. तरी या नववर्षातील नव्या कल्पनेसह येणाऱ्या उपक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर व जिल्हा सरचिटणीस वैभवी कसालकर यांनी केले आहे.




🔵 उंच माझा झोका उपक्रमाअंतर्गत कर्तबगार महिलांची वेशभूषा व मनोगत उपक्रम

🔵 उंच माझा झोका उपक्रमाअंतर्गत कर्तबगार महिलांची वेशभूषा व मनोगत उपक्रम                        ♦️सहभागी शाळा      

1) राजमाता जिजाबाई - शाळा हरकुळ नं .५    

2) सावित्रीबाई फुले- शाळा तळेरे वाघाची  

3) जिल्हा परिषद शाळा - ओटव नं.१ - सिंधुताई सपकाळ                                 

4) सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली क्र. 3 - झाशीची राणी लक्ष्मीबाई                      

5) माता रमाबाई  - सांगवे तेलंगवाडी 

6) मी सिंधुताई सपकाळ -  फोंडा सुतारवाडी

7) आनंदीबाई गोपाळ  :  शाळा बोर्डवे नं 3                

8) कल्पना चावला, शाळा भिरवंडे नं.1

9 )अहिल्याबाई होळकर शाळा तळेरे नं 1

10) रमाबाई रानडे - हरकुळ खुर्द नं.1

11) डॉ रखमाबाई राऊत - माईन नं 1     

12) राजमाता जिजाबाई - शाळा कासार्डे देऊलकरवाडी

13)झाशीची राणी लक्ष्मीबाई -शाळा तरंदळे कुंदेवाडी



महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवली " बालिका दिन " साजरा करणार

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा कणकवली " बालिका दिन " साजरा करणार 

कणकवली : 

          बालिका दिन सप्ताह साजरा करण्यासाठी शिक्षक समिती कणकवली तालुक्याने " कर्तबगार महिलांच्या वेशभुषा " हा उपक्रम निवडला आहे . या  उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थिनींना सहभागी करून व्हिडिओ पाठविणार आहेत. जे शिक्षक / शाळा सहभागी होणार आहेत त्यांनी शाळेचे नाव व कोणाची वेशभुषा करणार  ते नाव कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

          तालुका स्तरावर आलेल्या व्हिडिओ मधून उत्कृष्ट असलेला व्हिडिओ जिल्हा महिला आघाडीकडे पाठवून  प्रसारित करण्यात येणार आहे. जिल्हा महिला कार्यकारिणीकडे पाठवायचा व्हिडिओ निवडण्याचे अधिकार महिला आघाडी तालुका कार्यकारिणीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त शाळांनी उंच माझा झोका या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समिती महिला आघाडी तालुकाध्यक्षा नेहा मोरे यांनी केले आहे. 



🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...