रविवार, २६ मार्च, २०२३
शुक्रवार, २४ मार्च, २०२३
🔴 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न होणार
🔴 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न होणार
🔹कणकवली तालुका शाखेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम
कणकवली :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवारी २६ मार्च २०२३ रोजी टोनी म्हापसेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) यांचे अध्यक्षतेखाली सकाळी १०.०० वा. शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर , कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटशिक्षणाधिकारी किशोर गवस , जिल्हाध्यक्ष नारायण नाईक , जिल्हा सरचिटणीस सचिन मदने , ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण , ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर , शिक्षक नेते नंदकुमार राणे , जिल्हा प्रवक्ते सुनिल चव्हाण ,
जिल्हा नेते नितीन कदम , शिक्षक पतपेढी
अध्यक्ष नामदेव जांभवडेकर , उपाध्यक्षा निलम बांदेकर , जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा
निकिता ठाकूर , जिल्हा महिला सचिव वैभवी कसालकर , उपाध्यक्ष लवू चव्हाण ,चंद्रसेन पाताडे , कोषाध्यक्ष लवू दहिफळे , शिक्षक नेते
गिल्बर्ट फर्नांडिस , शिक्षक पतपेढी संचालक
आनंद तांबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रवक्ते विनायक जाधव , कार्याध्यक्ष दिलीप धामापूरकर , तालुका महिला अध्यक्षा नेहा मोरे , सचिव विनिता शिरसाट , कार्याध्यक्ष प्रशांत दळवी , जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर , कोषाध्यक्ष महेश चव्हाण , उपाध्यक्ष संदिप तांबे , धिरज हुंबे , अनिल खोत , गौतम जाधव , राजेंद्र कडुलकर , कार्यालयीन सचिव समीर पाटील , प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुबल इत्यादी तालुका कार्यकारिणी उपस्थित असणार आहे.
त्यावेळी दत्तक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वितरण होणार आहे. तसेच विद्यार्थी गुणगौरव , सेवानिवृत्त व पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा समारंभपूर्वक सन्मान करण्यात येणार आहे.
सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, महिला आघाडी सदस्या, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी , पालक व शिक्षक यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी केले आहे.
गुरुवार, २३ मार्च, २०२३
🔵 शिक्षक समिती कणकवलीचा मदतीचा हात
🔵 शिक्षक समिती कणकवलीचा मदतीचा हात
शाळा नडगिवे नं १ येथे इयत्ता ६ वीत शिकणारा विद्यार्थी यश संदिप नार्वेकर खेळताना शाळेत पडल्याने हात फ्रॅक्चर झाला होता. सदर विद्यार्थ्याला डॉ. नवरे कणकवली यांच्याकडे ऍडमिट करून उपचार करण्यात आले आहेत. सदर विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षक समिती कणकवली यांच्या वतीने ३०००/- रुपये आर्थिक मदत देण्यात आली.
त्यावेळी खारेपाटण केंद्रातील शिक्षक समितीचे पदाधिकारी मंगेश मुद्रस, अमोल तुपविहीरे , राजेश तेरवणकर , इरफान सारंग , सुप्रिया शेट्ये , नडगिवे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर आणि विद्यार्थ्याचे पालक उपस्थित होते. यशच्या पालकांनी शिक्षक समितीच्या आर्थिक सहाय्याबाबत धन्यवाद व्यक्त केले आहेत.
शनिवार, ११ मार्च, २०२३
मंगळवार, ७ मार्च, २०२३
तातडीची सभा शिक्षक समिती कणकवली अपडेट
. तातडीची सभा
शिक्षक समिती कणकवली अपडेट
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
दिनांक 7 मार्च 2023 रोजी सायं. ४:३० वा. जि.प.शाळा कलमठ बाजारपेठ येथे कार्यकारिणी सदस्य व BLO आदेशीत शिक्षकांची तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
👉🏼 BLO चे काम नाकारणाऱ्या शिक्षकांना तहसीलदाराकडून अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, याबाबत वकिलांचे मार्गदर्शन घेऊन सदरचे काम तूर्तास स्वीकारणे आणि नंतर सदरचे काम करण्याची सक्ती करत असल्याबाबत संघटनेच्या वतीने BLO शिक्षकांसमवेत कोर्टामध्ये केस दाखल करावी. याच्या खर्चासाठी नीधी उभारण्यात यावा असे ठरविण्यात आले.
👉🏼 तसेच अशैक्षणिक कामे लादत असल्याबाबत संघटनेच्या वतीने मा. प्रांताधिकारी यांना धरणे आंदोलनाची नोटीस देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.
👉🏼 दिनांक 8 मार्च 2023 रोजी याबाबत वकिलांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी दिनांक 9 मार्च 2023 रोजी मा. प्रांताधिकारी यांना आंदोलनाची नोटीस देण्यात येईल.
👉🏼 दिनांक १४ मार्च २०२३ पासून जुनी पेन्शन च्या मागण्यासाठी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात शिक्षक समिती सामिल आहे . त्यामुळे हा संप यशस्वी करण्यासाठी १०० % शिक्षकांनी संपामध्ये उतरावे अशा प्रकारचा निर्णय घेऊन त्याबद्दलत्याबाबत चे नियोजन करण्यात यावे असे ठरविण्यात आले.
विनम्र
अध्यक्ष / सचिव
शिक्षक समिती कणकवली
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...



























































