सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

बातमी : ऑक्सिजन प्लँट

 



५ सप्टेंबरला जि. प. अध्यक्षा सन्मा .सौ .संजना सावंत व राज्याध्यक्ष सन्मा .श्री . उदयजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

🟩महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न


🟨 ५ सप्टेंबरला जि. प. अध्यक्षा सन्मा .सौ .संजना सावंत व राज्याध्यक्ष सन्मा .श्री . उदयजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण 

 🟦 कोरोना बाधित व्यक्तींकरीता काही भरीव कार्य करावे या उद्देशाने शिक्षक समिती सिंधुदुर्गने  "ऑक्सिजन निर्माण प्लांट व ऑक्सिजन बेडयुक्त सुसज्ज कोव्हीड कक्ष " उभारण्याचे शिवधनुष्य लिलया पेलून दाखवले आहे . 

🟪 अशा या ऑक्सिजन निर्माण प्लांट व ऑक्सिजन बेडयुक्त सुसज्ज कोव्हीड कक्षाचे लोकार्पण सन्मा .सौ . संजना सावंत ( अध्यक्ष ,जि .प . सिंधुदुर्ग ) व सन्मा . श्री . उदयजी शिंदे ( राज्याध्यक्ष , म .रा . प्रा . शिक्षक समिती ) यांच्या हस्ते सकाळी ९ .०० वा . उपजिल्हा रुणालय , कणकवली येथे संपन्न झाले.

🟧 प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने ४६ लाख रूपये स्वतः उभे करून उभारलेला , देशभरातील इतरांना आदर्शवत ठरेल असा एकमेव आॉक्सिजन निर्माण प्लांट आहे .

🟥 या लोकार्पण सोहळयास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व  शिलेदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद

🟩 होय , मी ही जपलंय सामाजिक भान , देऊन प्राणवायूचं दान 

               ©️ अध्यक्ष / सचिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , सिंधुदुर्ग





















शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

बोर्डवे केंद्रातील शाळा ओसरगाव कानसळी मधील विद्यार्थीनी कुमारी वृषाली चंद्रकांत वडार हिला शैक्षणिक साहित्य किट देण्यात आले.

 🟥 महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती शाखा कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थी उपक्रम


🟩 बोर्डवे केंद्रातील शाळा ओसरगाव कानसळी मधील विद्यार्थीनी कुमारी वृषाली चंद्रकांत वडार हिला शैक्षणिक साहित्य किट देण्यात आले.


🟨 त्यावेळी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री आप्पा देसाई ,जिल्हा कार्यालयीन चिटणीस श्री संतोष कुडाळकर,बोर्डवे केंद्रसंघटक श्री प्रशांत दळवी,श्री दिलीप कदम,विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


🟦 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली






सेवानिवृत्त शिक्षिका सन्मा. श्रीम. सुप्रिया घोरपडे मॅडम यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

 🟥 दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त शिक्षिका सन्मा. श्रीम. सुप्रिया घोरपडे मॅडम यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार तालुका शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्प देवून सत्कार करण्यात आला.

🟩 सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयीन चिटणीस मा. श्री. संतोष कुडाळकर, तालुका सरचिटणीस श्री. सुशांत मर्गज, तालुका उपाध्यक्ष श्री. टोनी म्हापसेकर, कोषाध्यक्ष श्री. संतोष राणे, श्री. प्रशांत दळवी, श्री. प्रशांत सावंत, श्री. मंगेश राणे, श्री. दिलीप कदम, श्रीम. प्रियांका सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

🟨 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली







🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...