रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

🛑 सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा ना.रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवाळी सण असताना शिक्षक पगार चार जिल्हे सोडून अद्याप पर्यंत न झालेबद्दल निवेदन देऊन नाराजी व्यक्त करण्यात आली.

 🛑 सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा ना.रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवाळी सण असताना  शिक्षक पगार चार जिल्हे सोडून अद्याप पर्यंत न झालेबद्दल निवेदन देऊन नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर , जिल्हाध्यक्ष नारायण नाईक , सरचिटणीस सचिन मदने उपस्थित होते.    

▪️बी एल ओ कामाची सक्ती करू नये.

▪️विषय पदवीधर- केंद्रप्रमुख-विस्तार अधिकारी रिक्त पदे  50-50 च्या निकषानुसार तात्काळ भरणे. 

▪️सेवानिवृत्त  शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर करणे.

▪️आंतरजिल्हा बदली  कार्यमुक्तिच्या धोरणावरुन  कार्यमुक्तिच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांवर अन्याय करू नये.

▪️टि ई टी 2010 पात्र उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ति द्यावी. 

▪️20 पटाच्या शाळा बंद करू नयेत. 

▪️2021-22 चे समग्र अनुदान शाळांना मिळावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

▪️यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद वारंग , सावंतवाडी तालुका अध्यक्ष समीर जाधव , शशांक आटक , शिल्पा जाधव , धनदा शिंदे , सतीश राऊळ ,  प्रवीण शेर्लेकर , तुषार आरोसकर ,  प्रसाद डेगवेकर , परेश नाईक आदी उपस्थित होते.

राजन कोरगांवकर

राज्य उपाध्यक्ष

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...