रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

🌑 आपण मात्र तुपाशी ऐन दिवाळीत शिक्षक मात्र उपाशी

 🌑 आपण मात्र तुपाशी ऐन दिवाळीत शिक्षक मात्र उपाशी

          "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती" म्हणून आपण शासनाकडे १ ₹ पाठविण्याचे अभिनव आंदोलन केवळ एक उपचार वा प्रतिक्रिया नाही. तर शिक्षण संचालनालय व शालेय शिक्षण विभागाकडून आपल्या शिक्षकांच्या वेतन आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी अनुदान उपलब्ध करून न देण्याच्या उदासीन धोरण संबंधाने दिली जाणारी जोरदार चपराक आहे.

          आजच्या काळात एक रुपयाला कोणतीही किंमत नाही आणि आपण एक रुपया वर्गणी शासनाला आमच्यासाठी तरतूद करण्याचे योगदान म्हणून पाठवत आहोत्. शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातील संबंधित अधिकारी एक रुपयाची मनी ऑर्डर स्वीकृत करताना शासनाला अंतर्मुख होऊन विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. 

          या एक रुपयामुळे वेतनाचा मार्ग मोकळा होईल असे म्हणणे अत्यंत धाडसाचे होईल. परंतु एक रुपयाच्या मनी ऑर्डर चळवळीमुळे मंत्रालयातील संबंधित विभागात निश्चितच चर्चा होईल. 

          वर्धा जिल्ह्याने शासनाला पाठविलेली नोटीस आणि पाच मनीऑर्डर ची Acknowledgement आज E-Mail केल्यानंतर दुपारी शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. सोमवारी दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी मा. राज्य आयुक्त (शिक्षण) वेतन विलंबाबाबत सर्व संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीतून काय मार्ग निघतो ते यथावकाश कळेलच.

          परंतु आपण ढीम्म न बसता- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चळवळीत सक्रिय असून जीवंत असल्याचे शासनाला सांगितले आहे.

          "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती" च्या सर्व जिल्हा व तालुका शाखांनी सोमवारी दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी १ ₹ मनीऑर्डर करावी.

          तसेच बुधवारी दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी काळी फीत लावून कामकाज करण्यासाठी शिक्षक बांधवांना आवाहन करून आम्ही शासनाच्या पक्षपातीपणाचा विरोध करू हे दाखवून द्यावे ही विनंती.जय समिती..

   राजन कोरगांवकर
   राज्य उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...