🟣 आचार्य देवो भव
🟡 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली यांच्या वतीने करण्यात आला सत्कार
🟤 गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी केला गुरुंचा महागुरुंनी सन्मान
आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिनाचे औचित्य साधून कलमठ बाजार प्रशालेत सत्कार व गुणगौरव सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यात उपक्रमशील शिक्षक , शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी , होतकरु गरजु विद्यार्थी , देशभक्तीपर गीतगायन उपक्रम सहभागी महिला शिक्षिका , ' खजिना कथांचा ' उपक्रम सहभागी महिला शिक्षिका , कलांकुर उपक्रम सहभागी महिला शिक्षिका , सेवानिवृत्त झालेले शिक्षक , संप्रेषण साहित्य निर्मिती कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते शिक्षक यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते शारदापूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी तालुकास्तरीय संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला.
कणकवली तालुक्यातील २२ केंद्रातील २२ हुशार व होतकरु मुलांना प्रत्येकी एक स्कुल बॅग , दोनशे पानी वह्या , छत्री , कंपासपेटी , सॅनिटायझर , मास्क , शिसपेन्सिल , पेन , मोठी काचेची पट्टी , रंगीत तेल खडू , चित्रकला वही , पॅड व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सत्कार मूर्तींना ' सहज सोपे मराठी व्याकरण ' या पुस्तकाची भेट देण्यात आली. श्री. डी.एन. मलये चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीम. कल्पना धाकू मलये यांच्या सहकार्याने पुस्तके देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदम , सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष मा. नामदेव जांभवडेकर , मा. चंद्रसेन पाताडे , शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , शिक्षक बँकेचे संचालक मा. आनंद तांबे यांचा तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांच्या शुभहस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व पुस्तकभेट देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे तालुका पदाधिकारी यांनाही शाल , श्रीफळ व पुस्तकभेट देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेत नवीन प्रवेश केलेल्या शिक्षकांनाही स्मृतिचिन्ह, शाल , श्रीफळ व पुस्तकभेट देण्यात आले.
आजपासून कणकवली शिक्षक समितीने नवीन ' गाऊ आनंदे ' हा उपक्रम सुरु करत असल्याबाबत घोषणा करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुरु झालेला नवीन उपक्रम हा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या मराठी कवितांचे गायन करुन संघटनेच्या युट्युब चॅनेल वर प्रसारित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्कार समितीने केलेल्या विशेष मेहनतीबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. महिला आघाडीच्या विविध उपक्रमांबद्द्ल सर्व सहभागी महिला सदस्यांचे जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षा मा. निकिता ठाकूर व सरचिटणीस मा. नेहा मोरे यांनी विशेष कौतुक करुन प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.
मा. नितीन कदम , मा. दादा जांभवडेकर , मा. चंद्रसेन पाताडे यांनी आपले विचार मांडले व कणकवली तालुका शाखेच्या उपक्रमांचे तोंड भरुन कौतुक केले. कणकवली सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.
आपले विनम्र :
🌐 मा. गिल्बर्ट फर्नांडिस , शिक्षकनेते
मा. विनायक जाधव , तालुकाध्यक्ष , कणकवली
मा. सुशांत मर्गज , तालुका सरचिटणीस , कणकवली
मा. निकिता ठाकूर , तालुका अध्यक्षा , महिला आघाडी , कणकवली
मा. नेहा मोरे , तालुका सरचिटणीस , महिला आघाडी , कणकवली
©️ प्रसिद्धी प्रमुख : प्रवीण कुबल







































































