शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने सातत्याने विद्यार्थी ,शिक्षक ,समाज या सर्व घटकांचे हितार्थ नवनवीन उपक्रमांचे आयोजन : शिक्षक नेते भाई चव्हाण

कणकवली : ३१ डिसेंबर २०२१ 

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेच्या वतीने सातत्याने विद्यार्थी ,शिक्षक ,समाज या सर्व घटकांचे हितार्थ नवनवीन उपक्रमांचे आयोजन करुन ते यशस्वी करत असते.देशभक्तीपर गीयगायन पंधरवडा , खजिना कथांचा कलांकुर (कार्या . आधारित ) , गाऊ आनंदे ( मराठी कविता गायन ) , कोरोना कालावधीत विविध स्तरावर मदतकार्य , दत्तक विद्यार्थी , शिष्यवृत्ती सराव परीक्षा , रक्तदान शिबिर अशा अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या या माझ्या  कणकवली शाखेचा मला अभिमान आहे. 

          सन 2022 या नवीन वर्षाच्या प्रथम दिना पासून आपल्या विद्यार्थ्यांसाठी Let's Learn English हा व्याकरणावर आधारीत उपक्रम आपण शुभारंभीत करत आहात.सन्मा.प्रदीप मांजरेकर, सन्मा.संतोष कुडाळकर , सन्मा. आनंद तांबे, सन्मा.महेंद्र पवार यांसर्वाबरोबरच तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक विद्यार्थीहितासाठी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडतीलच.  या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद .

कणकवली तालुकाध्यक्ष सन्मा.विनायक  जाधव , सचिव सन्मा.सुशांत मर्गज यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वैभवात भर घालणाऱ्या तुम्हा सर्व कणकवलीकरांना मनःपूर्वक अभिवादन.

तुमचा भाई चव्हाण



" विद्यार्थी व शिक्षक यांच्या भेटीला नवीन वर्षात येतोय " शिक्षक समिती कणकवलीचा " नवीन उपक्रम " Let's Learn English "

(कणकवली दि .३१ डिसें .२०२१) 

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीने आजपर्यंत अनेक उपक्रम राबविले. यातील अनेक उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित होते .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेत असताना, इंग्रजी यासारख्या विषयाची तयारी अधिक चांगल्या प्रकारे व्हावी , यासाठी इंग्रजी व्याकरणावर भर देऊन विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल ,असा नवीन उपक्रम शनिवार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे ......." Let's Learn English ".

          या उपक्रमाचे प्रमुख आहेत सन्मा. श्री.प्रदीप मांजरेकर सर ( राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ) व सन्मा. श्री. संतोष कुडाळकर सर तसेच तंत्र सहाय्य करताहेत  सन्मा. श्री.आनंद तांबे सर ( संचालक )व श्री. महेंद्र पवार सर .या उपक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या, माझ्या समिती शिलेदारांनी या उपक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला आहे त्यापैकी अनेक जणांनी स्वतःच तंत्रसहाय्य ( व्हिडिओ निर्मिती) केलं आहे. आम्हांला खात्री आहे शिक्षक समिती कणकवलीचा हा उपक्रम, निश्चितच सर्वांना मार्गदर्शक ठरेल.

(Happy New year 2022)

                   अध्यक्ष /सचिव 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली



शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

कणकवली तालुका शाखेची विस्तृत कार्यकारिणी सभा उत्साहात संपन्न

 🔴 शिक्षक समिती कणकवली तालुका अपडेट

🔴 आज शनिवार दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी कणकवली तालुका शाखेची विस्तृत कार्यकारिणी सभा उत्साहात संपन्न झाली.

🔴 सभा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मारुती विद्यामंदिर , जानवली येथे सभा संपन्न झाली.

🔴 तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. 

🔴 त्यावेळी सभेला व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदम , राज्य उपाध्यक्ष मा. राजन कोरगावकर , जिल्हा सचिव मा. सचिन मदने , शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक मा. आनंद तांबे , मालवणचे मा. रुपेश गरुड , महिला आघाडी अध्यक्षा मा. निकिता ठाकूर , जिल्हा महिला संघटक मा. सुजाता टिकले , मा. म्हसकर , मा. ऋजुता जंगले व कणकवली तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज , जानवली केंद्रप्रमुख मा. के. एम्. पवार व आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त पदवीधर शिक्षक मा. प्रदिप मांजरेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बहुसंख्य जिल्हा व तालुका पदाधिकारी , समिती शिलेदार उपस्थित होते. 

🔴 मागील सभेचे इतिवृत्त वाचन करुन त्यावर मंजूरी घेण्यात आली.

🔴 प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी केले. त्यांनी कणकवली तालुका शाखेचा संघटनात्मक आढावा घेतला. त्यांनी शिक्षकांचे मासिक वेतन वेळीच होण्याबाबत केलेली कार्यवाही कथन केली. नवीन इंग्रजी विषयक उपक्रमाच्या नियोजनाबद्दल सांगितले. ओझरम येथील गरजू शाळकरी मुलांना 4957 रुपयांची आर्थिक मदत दिल्याचे सांगितले. तसेच सन 2019 - 2020 व सन 2020 - 2021अंतर्गत अभिलेखे जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदम , शिक्षक बँकेचे संचालक मा. संतोष मोरे , कार्यालयीन चिटणीस मा. आप्पा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तपासले असल्याचे सांगितले. ऑक्सिजन प्लॅन्टची देणगीदार प्रमाणपत्रे केंद्रनिहाय वितरित करण्यात आली. 

🔴 तालुका कोषाध्यक्ष मा. संतोष राणे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा करुन त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

🔴 मा. सचिन मदने , सरचिटणीस सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन झाले. त्यांनी कणकवली शाखेचे सर्वप्रथम सभासद नोंदणी केल्याबाबत अभिनंदन केले. ऑक्सिजन प्लॅन्टच्या भरीव देणगीबाबत जिल्हा शाखेच्या वतीने अभिनंदन केले. त्यांनी अप्रशिक्षित शिक्षकांच्या लढ्याविषयी माहिती सांगितली. DCPS , NPS संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यासंदर्भात जिल्हास्तरावर प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचे सांगितले. 

🔴 2002 मध्ये अ.नो. सु.ता. असलेल्या शिक्षकांच्या वेतनातील फरकाबाबत मा. हेमंत राणे यांनी जिल्हा पदाधिकारी यांच्यासमोर समस्या मांडली. त्यावर जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदम यांनी यावर सकारात्मक विचार मांडले व अशा शिक्षकांची वेगळी यादी तयार करुन जिल्हापातळीवरून प्रयत्न केले जातील असे सांगितले.

🔴 राज्य उपाध्यक्ष मा. राजन कोरगावकर यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की आपल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. कृपया गाफील राहू नका , आपली संघटनात्मक ताकद दाखवा. समिती शिलेदारांचा संवाद कमी पडता कामा नये याची काळजी घ्या. एकमेकांच्या संपर्कात राहा. आपली शिक्षक समिती जागृत आहे. तिचे विचार प्रज्वलित ठेवा. शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी मोलाचे सहकार्य करा असे आवाहन केले.

🔴 जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदम यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी तालुकास्तरीय विविध बैठका सुरु असल्याबाबत सांगितले. ते सर्वांना आवाहन करत म्हणाले , " सर्वांनी संपर्काधिष्टीत राहून जिल्हा बँकेत आपला उमेदवार निवडून आणा. " 

🔴 मा. प्रदिप मांजरेकरसर यांनी सर्वांची चांगल्या प्रकारे व्यवस्था पाहिली.

🔴 तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज यांनी सर्वांचे आभार मानले.



























गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

विस्तृत तालुका कार्यकारिणी सभा शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१

 🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

    *शिक्षक समिती, कणकवली तालुका विस्तृत तालुका कार्यकारिणी सभा*

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮


        आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीची विस्तृत तालुका कार्यकारिणी सभा शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ठिक ४.०० वा. जि. प. शाळा जानवली मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात  आली आहे. तरी सदर सभेस आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

  

   🔮  सभेपुढील विषय🔮


१) मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजूरी

२) संघटनात्मक कामाचा आढावा

३) तालुका कोषाध्यक्ष यांच्या राजीनाम्याबाबत.

४) मा. राज्य व जिल्हा पदाधिकारी यांचे संघटनात्मक विशेष मार्गदर्शन

५) मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय

       


🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

       सचिव                           अध्यक्ष

श्री. सुशांत मर्गज            श्री. विनायक जाधव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा - कणकवली

🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...