🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिला मदतीचा हात
🟢 कणकवली तालुका शाखेमार्फत कोविडने पालक हरवलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
🟡 कणकवली :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कोविडमुळे आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना आर्थिक मदत देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. कणकवली तालुक्यातील अशा १३ मुलांना रोख दोन हजार रुपयांची आकस्मिक मदत देऊन आम्हीही तुमच्यासोबत आहोत असा दिलासादायक हात पाठीवर ठेवून आधार देण्याचे कार्य समिती करीत आहे. त्यावेळी शाळा तरंदळे नं. १ येथे झालेल्या कार्यक्रमात गणेश निलेश घाडीगांवकर याला दोन हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली.
शिक्षक समिती कणकवली आयोजित मदत कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत शाळा तरंदळे नं. १ च्या मुख्याध्यापिका शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी केले. शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संघटनेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्व उपस्थितांचे आभार मानले.
त्यावेळी कणकवली शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज, तरंदळे नं.१ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवलकर , संघटनेचे सहसचिव समीर पाटील , कार्यालयीन चिटणीस महेश चव्हाण , तालुका संघटक अजित कदम , केंद्रसंघटक सुभाष तांबे , माजी कार्यालयीन चिटणीस प्रकाश बुचडे , सल्लागार सुजाता साटविलकर आणि पालक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा