🛑 शिक्षक समिती कणकवली शाखेचे रक्तदान शिबिर संपन्न
⭕ तीसपेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर रक्तदात्यांनी केले रक्तदान
कणकवली ( भालचंद्र संस्थान )
सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी प.पु.भालचंद्र महाराज आश्रम संस्थान , कणकवली येथे सकाळी ९ : ०० वा. रक्तदान शिबीर संपन्न झाले.
त्यावेळी 30 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला साथ देत " रक्तदान हेच श्रेष्ठ दान " या सुवचनाप्रमाणे भरीव योगदान दिले.
आपल्या या रक्तदानामुळे आपण शिक्षक संघटनेच्या वतीने कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो ही निर्मळ भावना ठेवून सर्व रक्तदात्यांनी स्वेच्छेने व हसतमुखाने रक्तदान केले.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा , कणकवली तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
🩸 रक्तदान .......जीवनदान🩸🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
शाखा कणकवली


























































































































































