🛑 सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा ना.रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवाळी सण असताना शिक्षक पगार चार जिल्हे सोडून अद्याप पर्यंत न झालेबद्दल निवेदन देऊन नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर , जिल्हाध्यक्ष नारायण नाईक , सरचिटणीस सचिन मदने उपस्थित होते.
▪️बी एल ओ कामाची सक्ती करू नये.
▪️विषय पदवीधर- केंद्रप्रमुख-विस्तार अधिकारी रिक्त पदे 50-50 च्या निकषानुसार तात्काळ भरणे.
▪️सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर करणे.
▪️आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तिच्या धोरणावरुन कार्यमुक्तिच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांवर अन्याय करू नये.
▪️टि ई टी 2010 पात्र उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ति द्यावी.
▪️20 पटाच्या शाळा बंद करू नयेत.
▪️2021-22 चे समग्र अनुदान शाळांना मिळावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
▪️यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद वारंग , सावंतवाडी तालुका अध्यक्ष समीर जाधव , शशांक आटक , शिल्पा जाधव , धनदा शिंदे , सतीश राऊळ , प्रवीण शेर्लेकर , तुषार आरोसकर , प्रसाद डेगवेकर , परेश नाईक आदी उपस्थित होते.
राजन कोरगांवकर
राज्य उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग





.jpeg)
